साम्रद -अकोले या एसटी बसचे ब्रेक निकामी होऊन स्टेअरिंगही लॉक झाल्यामुळे झालेल्या अपघातात चालकासह १४ प्रवासी जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अकोले तालुक्यातील भंडारदरा-राजूर रस्त्यावरील द-याची वाडी जवळ घडली. ...
बुधवारी रात्री आठच्या सुमारास कोतुळ येथील बाजरतळ , अण्णाभाऊ साठेनगर, बसस्थानक परिसरात रस्त्याच्या कारणांमुळे दोन गटात झालेल्या हाणामारीत आठ ते दहा जण जखमी झाले. ...
गुरुवारी सकाळी नेप्ती बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. दरम्यान लिलाव सुरु झाल्यानंतर कांद्याचे तब्बल १००० ते १२०० रुपयांनी घसरल्यामुळे शेतकरी संतप्त झाले. व्यापा-यांनी अचानक भाव पाडल्यामुळे संतप्त शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडत बाजार ...
कोरेगाव-भीमा, सणसवाडी (ता. शिरूर) येथे १ जानेवारी रोजी झालेल्या जातीय दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या राहुल बाबाजी फटांगडे या तरुणाच्या मारेक-यांना पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथून पोलिसांनी अटक केली. ...
७ जानेवारीअखेर राज्यात झालेल्या गाळप व साखर उत्पादनापेक्षा यावर्षी याच तारखेला दुप्पट गाळप व उत्पादन झाले आहे. ७ जानेवारी २०१७ रोजी राज्यात २४०.५८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. यावर्षी ४४०.४७ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. ...
नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी सतत आजारपणाच्या रजेवर जात असल्याने प्रशासकीय कामाचा बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे विकास कामे ठप्प होऊन नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. ...
सार्इंचा रुग्णसेवेचा वसा चालविणा-या साईनाथ रूग्णालयात गेल्या वर्षभरात जवळपास ३ लाख ६६ हजार रूग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. यात ३ लाख ५१ हजार बाह्यरूग्ण तर १५ हजार ६७२ अंतर्रूग्णांचा समावेश आहे. ...
दुधाच्या कमी झालेल्या भावासंदर्भात तातडीने हस्तक्षेप करा, अन्यथा दुग्धविकास मंत्री महादेव जाणकार यांच्या दारात दूध ओतून आंदोलन छेडू, असा इशारा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे डॉ.अजित नवले यांनी दिला आहे. ...