प्रेमप्रीतीचें बंधन सहजासहजी तोडता येत नाही. एका गंध विषयाने जर त्या (भ्रमर) जीवाचा अंत केला तर पांचही विषय रात्रंदिवस उपभोगणाऱ्या या देहाचा अंत व्हायला वेळ लागेल का..? माणूस तर विषयसेवनाखेरीज अन्य कांहीच करीत नाही. ...
इंजिना पाठोपाठ रेल्वेचे डबे धावतात. डब्याच्या पाठोपाठ इंजिन धावत नाही तसेच मनाच्या मागे इतर इंद्रिये धावत असतात मग या मनरुपी इंजिनालाच जर भक्तीमार्गाकडे वळविले तर प्रश्नच निर्माण होत नाही. इतर इंद्रिये आपोआप त्या मार्गाने जातील..! ...