मन साफ, तर सर्व माफ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 03:52 PM2021-01-28T15:52:49+5:302021-01-28T15:53:14+5:30

आपण आनंदी राहायचे की दुःखी हे ठरवण्याचे अधिकार कुणालाही देऊ नका

Clear mind is key to happyness | मन साफ, तर सर्व माफ!

मन साफ, तर सर्व माफ!

googlenewsNext

      नेहमी भूतकाळातील गोष्टी विसरून जात चला... कारण सतत मागच्या गोष्टींचा विचार करत राहिलात, तर त्याचा परिणाम वर्तमानातील जगण्यावर आणि भविष्यावर होत असतो...
      लोक आपल्याविषयी काय बोलतात याकडे अजिबात लक्ष देण्याची गरज नाही... कारण पाठीमागे लोकं तर राजाला सुध्दा शिव्या देत असतात...
     प्रत्येक समस्येवर उपाययोजना आहेच... काळाच्या ओघात सगळ्या गोष्टींवर उपाय सापडतो... त्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागतो...
     स्वतःच्या आयुष्याची कधीही इतरांशी तुलना करू नका आणि त्यावरून इतरांविषयीचे मत बनवू नका... कारण त्यांच्या आयुष्यातील वादळे आणि संकटांची तुम्हाला कल्पना नसते...
     अतिविचार करीत बसू नका... काही प्रश्नांची उत्तरे न मिळालेलीच बरी असतात... कदाचित तुम्ही अपेक्षा ठेवली नसताना देखील ती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील...
     तुमच्या आनंदाला फक्त तुम्हीच जबाबदार आहात... आपण आनंदी राहायचे की दुःखी हे ठरवण्याचे अधिकार कुणालाही देऊ नका... पोट दुखेपर्यंत हसा... लक्षात ठेवा, जगातील सगळ्या प्रश्नांचा भार कुणीही तुमच्या डोक्यावर दिलेला (ठेवलेला) नाही....
      सुंदर डोळ्यांसाठी जगातील फक्त चांगल्या गोष्टींकडेच पहा... सुंदर ओठांसाठी नम्र आणि मृदू भाषेचा वापर करा... कधीही आपण एकटे नाही, याची जाणीव ठेवा... आयुष्याच्या वाटेवर चालत राहून आनंदाने जगा...
     कधीकधी केराचा डबाही आपल्याला मनापेक्षा बरा वाटतो... कारण तो दिवसातून एकदा का होईना निदान रिकामा तरी होतो...
     आपण मात्र मनात कितीतरी दुःखद आठवणी साठवतो... काय मिळवतो यातून आपण?... आपणच स्वतःचे दुःख वाढवत राहतो... घडून गेलेल्या वाईट गोष्टी वर्षानुवर्षे मनात ठेवतो... त्या ज्या गोष्टीमुळे घडल्या त्यांचा पुढे आपणच तिरस्कार करतो...
     आता केराच्या डब्यासारखंच दररोज आपलं मनही साफ करायचं... जुने दु:ख विसरून सारे नवीन स्वीकारायचे... नव्या सुखांना त्यात आनंदाने भरायचं...
      सुखी जीवनाचे तंत्र आता आपण सर्वांनीच शिकायचं... स्वतः नेहमीच आनंदी रहायचं... आणि दुसर्‍यांनाही आनंदी ठेवायचं..जसे झाड आपल्या वर कुऱ्हाड चालवणाऱ्या लोकांना देखील शुद्ध हवा व सावली देऊन आपला चांगला गुणधर्म सोडत नाही त्याच प्रमाणे आपण देखील करणे गरजेचे आहे.यामुळें
      एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा... आपलं मन साफ ठेवा, कुणाबद्दल राग, द्वेष, सुडबुद्धी, तिटकारा, आकस, ठेऊ नका मग पहा आयुष्यात काहीच चुकीचं घडणार नाही, आणि आयुष्य देखील सुंदर होईल.काही चूक नकळत झाली असेल तर माफ करा ।

- शून्यानंद संस्कारभारती

Web Title: Clear mind is key to happyness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.