स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
रुपाली भोसलेने निळ्या रंगाच्या पैठणीतला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत रुपालीचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे. ती आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते. ...
Aai kuthe kay karte: अरुंधती आता विचारांनी स्वतंत्र होण्यासोबतच तिचे निर्णय घेण्यास सक्षम झाली आहे. त्यामुळे ती प्रत्येक गोष्टींमध्ये तिचं मत ठामपणे मांडताना दिसते. तर, अनिरुद्ध मात्र, पुन्हा एकदा संसाराच्या कचाट्यात सापडला आहे. ...
Aai kuthe kay karte: संजना घरात आल्यापासून सतत वादविवाद होताना दिसत आहेत. यात अनेकदा अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्यात मतभेद होत असल्याचं पाहायला मिळतं. ...