शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
2
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
3
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
4
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
5
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
6
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
7
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
8
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
9
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
10
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
11
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
12
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
13
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
14
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
15
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
16
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
17
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
18
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
19
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
20
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 

शिक्षकांनी बदलीसाठी दिलेली खोटी माहिती जि.प.ला भोवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 2:27 AM

चौकशी करून अभिप्राय पाठवा : कोकण आयुक्तांचे सीईओंना आदेश

- सुरेश लोखंडे ठाणे : शहराजवळील सोयीची शाळा मिळवण्यासाठी बहुतांशी शिक्षकांनी बनावट कागदपत्रे जोडल्याच्या तक्रारी अन्यायग्रस्त शिक्षकांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे केल्या होत्या. त्यानुसार, आयुक्तांनी सर्व कागदपत्रे तपासणीसाठी सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर बदल्यांमधील गंभीर घोळ निदर्शनात आला असून यावर स्वत: निर्णय घेण्याऐवजी आयुक्तांनी आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीच (सीईओ) तक्रारींवरील चौकशीसह अभिप्राय देण्याचे आदेश २४ एप्रिलला दिले आहेत. यामुळे ठाणे, पालघरसह कोकणातील बनवाबनवी करणाºया शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.ठाणे जि.प.च्या दोन हजार शिक्षकांसह पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदांच्या हजारो शिक्षकांच्या बदल्या आॅनलाइन झाल्या. कोकणातील या पाच जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या दोन महिन्यांपूर्वी झाल्या. राज्यातील अन्य जिल्हा परिषद शिक्षकांच्या या आॅनलाइन बदल्या वर्षभरापूर्वीच झाल्या. त्यातही काही शिक्षकांनी विविध निकषांचा लाभ घेऊन शहराजवळ व सोयीच्या शाळा मिळवल्या. यातील बहुतांश शिक्षकांनी वैद्यकीय प्रमाणपत्र, अवघड शाळेत काम केल्याचे अर्जात नमूद करणे, पतीपत्नी एकत्रीकरणासाठी नोकरीचे अंतर दूर दाखवणे आदींची बनावट कागदपत्रे आणि चुकीची माहिती दिल्याचे निदर्शनात आले. यासंदर्भात लोकमतने ‘बदल्यांसाठी शिक्षकांची बनावटगिरी’ या मथळ्याखाली १० मार्च रोजी वृत्त प्रसिद्ध करून हा विषय उघड केला होता. या आॅनलाइन बदल्यांमध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या दोन हजार ११९ शिक्षकांचा समावेश आहे. यातील बहुतांशी शिक्षकांनी बनावट वैद्यकीय दाखले व चुकीची दिशाभूल करणारी माहिती अर्जात दिली. यामुळे बनावटगिरी करणाºया शिक्षकांची सोयीच्या शाळेवर बदली झाली. यामुळे संतापलेल्या शिक्षकांनी तक्रारी करून न्यायप्राप्तीसाठी प्रयत्न केले. लोकमतच्या या वृत्ताची दखल घेऊन ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओंनी कागदपत्रांच्या तपासणीसाठी समिती गठीत करून अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले होते.विभागीय आयुक्तांनी घेतली गंभीर दखलया संवर्ग-३ व ४ च्या बदल्यांचीदेखील कागदपत्रे तपासण्याची जाणीव लोकमतने १५ मार्च रोजी वृत्त प्रसिद्ध करून दिली. याची दखल जिल्हा परिषदेऐवजी विभागीय आयुक्तांनी तत्काळ घेऊन सर्व बदल्यांबाबतच्या आवश्यक कागदपत्रांची परिपूर्ण माहिती सोमवार, ८ एप्रिल २०१९ रोजी सादर करण्याचे आदेश जारी केले होते. परंतु, यातील बदल्यांचा घोळ निदर्शनात आल्यानंतर मात्र आयुक्तांनी २४ एप्रिल रोजी पुन्हा आदेश जारी करून प्राप्त अर्जांवर चौकशी करून नियुक्ती प्राधिकारी म्हणून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह प्रकरणनिहाय अहवाल २ मे रोजी सादर करण्याचे आदेश सीईओंना दिले आहेत.याशिवाय, आयुक्त कार्यालयात आलेले सर्व तक्रार अर्ज संबंधित बदली आस्थापनेवरील कर्मचारी व कक्ष अधिकारी यांना घेऊन जाण्याचे आदेशही कोकण विभागीय उपायुक्त गणेश चौधरी यांनी जारी केले. यामुळे ठाणे जिल्हा परिषदेसह आता पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सीईओंनाही हे आदेश जारी झाले आहेत. यामुळे या आॅनलाइन बदल्यांमधील बनावटगिरी करणाºया शिक्षकांवर कडक कारवाई होण्याचे संकेत दिसून येत आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पारदर्शक चौकशी करून अहवाल सादर करण्याची अपेक्षा अन्यायग्रस्त शिक्षकांकडून होत आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक