उल्हासनगरात तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 01:38 IST2018-06-28T01:37:58+5:302018-06-28T01:38:02+5:30

प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा आरोप

Youth murder in Ulhasnagar | उल्हासनगरात तरुणाचा खून

उल्हासनगरात तरुणाचा खून

उल्हासनगर : कॅम्प नं-३ भीमनगर परिसरातील कैलास उर्फ कालू शामलाल रेशवाल या २१ वर्षीय तरुणाचा खून करून, त्याचा मृतदेह रेल्वे पटरीवर फेकून दिला. तरुणाच्या आईवडिलांनी हा अपघाती मृत्यू नसून, प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा आरोप केल्यावर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी एकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.
कैलासला मंगळवारी साडेआठ वाजता काही अनोखळी तरुणांनी सी ब्लॉक नाल्याजवळ नेले. तेथे मान, पोट व पायावर धारदार शस्त्रांनी वार करून त्याचा खून केला आणि गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह रेल्वे पटरीवर टाकला, असा आरोप तरुणाच्या आई-वडिलांनी केला आहे.
सी ब्लॉक परिसरातील काही नागरिकांनी रेशवाल यांच्या घरी धाव घेऊन कैलासचा रेल्वेने मृत्यू झाल्याचे सांगितले. आईवडील व नातेवाईक रुग्णालयात गेल्यावर त्यांना कैलासच्या अंगावर धारदार शस्त्राचे घाव दिसले. कैलासचा अपघाती मुत्यू नव्हे तर खून केल्याचा आरोप केला. उल्हासनगर पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केल्यानंतर, अनोळखी व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. प्रेमसंबधावरून खून झाल्याचा सशंय आईवडिलांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Youth murder in Ulhasnagar