भरधाव मोटरसायकल घसरून तरुणांचा मृत्यू
By सदानंद नाईक | Updated: December 12, 2023 15:29 IST2023-12-12T15:29:02+5:302023-12-12T15:29:11+5:30
या अपघातात निलेशच्या डोक्याला व हाताला मार लागला.

भरधाव मोटरसायकल घसरून तरुणांचा मृत्यू
उल्हासनगर : नेवाळी नाका येथील रस्त्यावर सोमवारी रात्री साडे १२ वाजता ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव मोटरसायकल घसरून डोक्याला मार लागल्याने, अंकित वर्मा या तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर मोटरसायकलस्वार विवेक विनोद सिंग जखमी झाला आहे.
उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी नाका रस्त्यावर सोमवारी रात्री साडे बारा वाजता विवेक विनोद सिंग यांच्या गाडीला ओव्हरटेक करून निलेश विनोद झा हा भरधाव मोटरसायकल चालवित होता. त्यादरम्यान भरधाव मोटरसायकलवरील नियंत्रण सुटल्याने, गाडी घसरून खाली पडली.
या अपघातात निलेशच्या डोक्याला व हाताला मार लागला. तर मोटरसायकलच्या मागच्या सीटवर बसलेला त्याचा मित्र अंकित वर्मा याच्या डोक्याला जोरदार मार लागुन त्याचा जागीच मृत्यु झाला. अपघाताची माहिती मिळाल्यावर हिललाईन पोलीसानी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत अंकित वर्मा यांचा मृतदेह ताब्यात घेतला. भरधाव मोटरसायकल चालवून मित्र अंकित वर्मा याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका पोलिसांनी निलेश झा यांच्यावर ठेवून गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.