उपवन तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 00:00 IST2024-07-31T00:00:16+5:302024-07-31T00:00:30+5:30
पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.

उपवन तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
जितेंद्र कालेकर ( ठाणे), लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: पोहतांना पाण्याचा अंदाज न आल्याने १९ वर्षीय करण सिंग (बिल्डींग नंबर २, मानपाडा, ठाणे) याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. वर्तकनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाला.
मानपाडा भागात राहणारा करण हा ३० जुलैला सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास उपवन तलावात पोहण्यासाठी उतरला. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. ही माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी वर्तकनगर पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. या पथकांनी शोधमोहीम राबवून त्याला पाण्यातून बाहेर काढले. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.