शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसकडून लॉलिपॉप वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 15:03 IST

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ गुरूवारी कल्याणमध्ये युवक जिल्हा काँग्रेसच्या वतीने अनोखे आंदोलन छेडण्यात आले.

कल्याण -  इंधन दरवाढीच्या निषेधार्थ गुरूवारी कल्याणमध्ये युवक जिल्हा काँग्रेसच्या वतीने अनोखे आंदोलन छेडण्यात आले. युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ब्रिजकिशोर दत्त यांच्या नेतृत्वाखाली छेडल्या गेलेल्या आंदोलनात पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी आलेल्या वाहन चालकांना लॉलिपॉप (कॅन्डी) वाटून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.  कल्याण मुरबाड रोडवरील प्रेम ऑटो परिसरात हे आंदोलन करण्यात आले. अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून निषेध नोंदवताना वाहन चालकांना पत्रकही वाटण्यात आली. ''मोदी सरकार हाय हाय, वाह रे मोदी तेरा खेल सस्ती दारू मेहँगा तेल'' यांसह अन्य घोषणा देत भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला.

सरकारचा विरोध दर्शविणारे फलकही मोठ्या प्रमाणात आणण्यात आले होते. यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसची भाववाढ करून सर्वसामान्यांना संकटाच्या खाईत लोटणा-या सरकारचा बेजबाबदार आणि निष्क्रिय असा उल्लेख करून निषेध नोंदविताना बहुत हुई पेट्रोल, डिझेल और गॅस की महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार का अंतिम संस्कार अशी पत्रकही आंदोलनकर्त्यांकडून वाटण्यात आली. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेस सर्वत्र राज्यव्यापी आंदोलन छेडत आहे.

याचाच एक भाग म्हणून जिल्हा पातळीवरही आंदोलने छेडण्यात आली. पेट्रोल आणि डिझेल हे जीएसटीच्या अंतर्गत आणावे जेणेकरून 25 ते 30 रुपयांर्पयत दर कमी होतील, आंतरराष्ट्रीय स्तरावर दर कमी असले तरी सरकारने वेगवेगळे कर-उपकर लावून दर वाढवून ठेवले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक त्रस्त आहेत. याचा निषेध तसेच इंधनाचे दर कमी व्हावेत म्हणून आंदोलन छेडत असल्याची माहिती दत्त यांनी दिली.  

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढPetrolपेट्रोलDieselडिझेल