ठाण्यात पार्किंगच्या वादातून तरुणावर तलवारीने हल्ला, शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यासह दाेघांना अटक
By जितेंद्र कालेकर | Updated: July 23, 2025 21:52 IST2025-07-23T21:52:03+5:302025-07-23T21:52:21+5:30
Thane Crime News: पार्किंगच्या वादातून अजय देवरस (२४) या तरुणावर तलवारीने हल्ला करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या माजी उपशाखाप्रमुख आकाश भालेराव उर्फ बाडी (२२, रा. साठेनगार, वागळे इस्टेट, ठाणे) आणि सुरज हजारे उर्फ सूर्या (२४, रा. साठेनगर, ठाणे) या दाेघांना वागळे इस्टेट पाेलिसांनी अटक केली आहे.

ठाण्यात पार्किंगच्या वादातून तरुणावर तलवारीने हल्ला, शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यासह दाेघांना अटक
- जितेंद्र कालेकर
ठाणे - पार्किंगच्या वादातून अजय देवरस (२४) या तरुणावर तलवारीने हल्ला करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या माजी उपशाखाप्रमुख आकाश भालेराव उर्फ बाडी (२२, रा. साठेनगार, वागळे इस्टेट, ठाणे) आणि सुरज हजारे उर्फ सूर्या (२४, रा. साठेनगर, ठाणे) या दाेघांना वागळे इस्टेट पाेलिसांनी अटक केली आहे. दाेघांनाही दाेन दिवस पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने बुधवारी दिले आहेत. दरम्यान, शिवसेनेतून त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कारवाशिंगचा व्यवसाय असलेले देवरस हे त्यांचे मित्र सचिन तासताेडे, अर्जून म्हेत्रे आणि मितेश कुऱ्हाडे हे तिघे वागळे इस्टेट भागातील हाॅकींग कंपनीसमाेरील नेहरु नगर येथील वाशिंग सेंटर येथे २२ जुलै २०२५ राेजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास बसले हाेते. त्याचवेळी शिवसेना शिंदे गटाचे कथित उपशाखाप्रमुख भालेराव आणि हजारे यांनी नेहरुनगर परिसरात पार्क केलेली सलीम यांची गाडी काढण्यासाठी बाेलविले. ती गाडी लावणाऱ्या सचिनला बाेलविले. सचिन ती गाडी काढण्यासाठी गेला नाही. याच रागातून आकाश आणि सूरज यांनी अजय आणि सचिन यांना मारहाण करुन तलवारीने हल्ला केला. यात अजयच्या डाव्या भुवईच्यावर, कपाळावर आणि डाव्या हातावर तर सचिन याच्या डाव्या हातावर, डाेक्यावर आणि उजव्या पायाच्या पाेटरीवर वार करुन खूनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी वागळे इस्टेट पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आकाश आणि सूरज या दाेघांनाही पाेलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. दरम्यान, या हल्लयाचा व्हिडिओ देखील साेशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला हाेता.
आकाश भालेराव हा पूर्वी शिवसेनेचा उपशाखाप्रमुख हेाता. सध्या त्याच्याकडे काेणतीही जबाबदारी नाही. त्याने तलवार दाखवून हल्ला करणे, दहशत माजविणे हे याेग्य नाही. त्याचे काेणत्याही प्रकारे समर्थन करणार नसून त्याला पदावरुन बडतर्फ केले जाणार आहे. - एकनाथ भाेईर, शिवसेना (शिंदे गट), विभाग प्रमुख, वागळे इस्टेट, ठाणे