भिवंडीत कंटेनरच्या धडकेत युवतीचा मृत्यू
By नितीन पंडित | Updated: February 21, 2023 18:17 IST2023-02-21T18:17:14+5:302023-02-21T18:17:57+5:30
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एक कंटेनरच्या धडकेत एक २५ वर्षीय अपंग युवती ठार झाल्याची घटना घडली आहे.कविता पैंजणे रा.संगमपाडा असे मृत तरुणीचे नाव आहे.

भिवंडीत कंटेनरच्या धडकेत युवतीचा मृत्यू
भिवंडी - शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एक कंटेनरच्या धडकेत एक २५ वर्षीय अपंग युवती ठार झाल्याची घटना घडली आहे.कविता पैंजणे रा.संगमपाडा असे मृत तरुणीचे नाव आहे.
हा कंटेनर खाडीपार येथे माल खाली करून अंजुरफाटा या भागात जात असताना छ.शिवाजी चौकात ही दुर्घटना घडली आहे. अपघाता नंतर कंटेनर चालक पळाला होता.काही दक्ष नागरीकांनी त्यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.यावेळी दुर्घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता.पोलिसांनी चालकावर कोणी हल्ला करू नये या साठी त्यास पोलीस व्हॅन मध्ये बसवून व्हॅन लॉक करून घेतली.घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती.
स्थानिक निजामपुरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल होत गर्दी पांगवीत मृत तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केले आहे.दरम्यान या दुर्घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.