शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार देणाऱ्या तरुणास पोलिसांची मारहाण, कानाचा पडदा फाटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 11:45 IST

खाडे यांनी मला मारत मारत लॉकअपकडे नेले आणि इतक्या जोरात कानाखाली मारली की, माझ्या कानाला इजा झाली, असा आरोप सुमेध याने केला.

अंबरनाथ: अंबरनाथमध्ये पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या सुमेध वेलायुधन या तरुणाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याने त्याच्या कानाचा पडदा फाटला असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. पोलिसांनी मात्र मारहाण झाल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.अंबरनाथ पश्चिमेला राहणारा वेलायुधन हा तरुण त्याच्या बहिणीसह सोमवारी रात्री अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेला होता. यावेळी  खाडे नावाच्या अधिकाऱ्यांनी त्याला बाहेर थांबण्यास सांगितले. नंतर पाटील कॉन्स्टेबलनी त्याला आतमध्ये बोलावले.  मात्र सुमेधला पाहून संतापलेल्या खाडे यांनी आतमध्ये कसा आला, अशी विचारणा केली. सुमेधच्या बहिणीने बोलण्याचा प्रयत्न केला असता, खाडे यांनी सरळ सुमेध याला मारायला सुरुवात केल्याचा आरोप त्याने केला. खाडे यांनी मला मारत मारत लॉकअपकडे नेले आणि इतक्या जोरात कानाखाली मारली की, माझ्या कानाला इजा झाली, असा आरोप सुमेध याने केला.

यानंतर सुमेध याने अंबरनाथ सिटिझन फोरमचे सत्यजित बर्मन यांना घटनेची कल्पना दिली.  बर्मन यांनी रात्री याबाबत पोलीस दलातील वरिष्ठांना ट्विट  केल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तालयाने याची त्वरित दखल घेतली. याबाबत अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांना विचारले असता, त्यांनी मात्र पोलिसांनी कुणालाही मारहाण केलेली नसल्याचे सांगितले आहे.

शस्त्रक्रिया करण्याची गरजबुधवारी सकाळी सुमेध वेलायुधन उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात गेला असता, त्याच्या कानाचा पडदा फाटल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुमेधवर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याने त्याला कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आले. सुमेधला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी बर्मन यांनी केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणेambernathअंबरनाथ