शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यात उडी घेणारा तरुण अद्याप बेपत्ता; पावसामुळे शोधकार्यात अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 19:04 IST

Drowning Case : सुरू असलेल्या पावसामुळे नाल्यामधील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अडथळे येत असल्याने पुन्हा शोधकार्य थांबविण्यात आल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

ठळक मुद्देशनिवारी रात्री आणि रविवारी ठाण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री चार तासात १४२ मिमी पडलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते.

ठाणेमुंब्रा खाडीत एका तरुणाने उडी मारल्याची घटना ताजी असतानाच रविवारी पहाटे ठाणे येथील उथळसर येथे राहणाऱ्या जीवन ओहाळ (३०) या तरुणाने उथळसर नाल्यात उडी मारल्याची घटना समोर आली. त्यानंतर ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध पहाटे, सकाळी आणि दुपारी असा नाला ते साकेत खाडी दरम्यान घेतला. पण, तो अद्यापही मिळून आलेला नाही. त्यातच सुरू असलेल्या पावसामुळे नाल्यामधील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अडथळे येत असल्याने पुन्हा शोधकार्य थांबविण्यात आल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

     

शनिवारी रात्री आणि रविवारी ठाण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री चार तासात १४२ मिमी पडलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. त्यातच नाल्यामध्ये पाण्याचा प्रवाह जोरात वाढला होता. याचदरम्यान सव्वादोन वाजण्याच्या सुमारास डॉ आंबेडकर रोड येथील मीनाताई ठाकरे चौक, उथळसर नाल्यात जीवन ओहाळ या तरुणाने उडी मारली. याची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे अग्निशमन दलाचे कर्मचारी व ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (TDRF Team) यांनी धाव घेत, पहाटे २ तास शोधकार्य केले, परंतु नाल्यामध्ये पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काही वेळ शोधकार्य थांबविण्यात आले होते. सकाळी ८ ते १० असे पुन्हा २ तास शोधकार्य करण्यात आले.त्यानंतर घटनास्थळी पुन्हा दुपारी ३ वाजताच्या सुमारास आंबेडकर रोड जवळील नाला ते साकेत खाडी परिसरामध्ये सुमारे ३ तास शोधकार्य करण्यात आले परंतु नाल्यामधील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे पुन्हा शोधकार्य थांबविण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली. 

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेthaneठाणेPoliceपोलिसFire Brigadeअग्निशमन दलRainपाऊसmumbraमुंब्रा