तरुणास दिला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:38 IST2021-03-08T04:38:20+5:302021-03-08T04:38:20+5:30

अनगाव : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणास मारहाण केल्याची घटना विठ्ठलनगरात शनिवारी घडली. रस्त्यावर भांडण सुरू होते. तेथून जाणारे ...

The young man was beaten | तरुणास दिला चोप

तरुणास दिला चोप

अनगाव : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणास मारहाण केल्याची घटना विठ्ठलनगरात शनिवारी घडली. रस्त्यावर भांडण सुरू होते. तेथून जाणारे गुलाम शेख (२५) याने पाहताच ओळखीचे असल्याने त्याने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता ताजराईन सोन, इमरानजैनुद्दीन शेख, इरफान शेख, रिजवान शेख यांनी त्याला मारहाण केल्याने गंभीर जखमी झाला. या प्रकरणी भोईवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

दुचाकीस्वार जखमी

अनगाव : भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पोने पाठीमागून दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याची घटना पिंपळासफाटा येथे शनिवारी घडली. स्वप्निल मेहेर (२५) असे दुचाकीचालकाचे नाव आहे. तो घरी जात असताना अपघात घडला. अपघातानंतर टेम्पोचालकाने पलायन केले. कोनगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: The young man was beaten