बॅरेज डॅम येथे तरुणाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:26 IST2021-06-29T04:26:58+5:302021-06-29T04:26:58+5:30
बदलापूर : शहरातील बॅरेज डॅम येथे तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. हा तरुण उल्हासनगर येथे राहत ...

बॅरेज डॅम येथे तरुणाचा बुडून मृत्यू
बदलापूर : शहरातील बॅरेज डॅम येथे तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. हा तरुण उल्हासनगर येथे राहत होता.
तुषार पाटील हा मित्रांसोबत बदलापूर पश्चिम येथील बॅरेज डॅम येथे पोहण्यासाठी आला होता. तुषार याला पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती बदलापूर पश्चिम पोलिसांमार्फत अग्निशमन दलाला देण्यात आली. नंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या तरुणाचा मृतदेह शाेधण्यास सुरुवात केली. मात्र बॅरेज डॅम येथे पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने अग्निशमन दलाला शोधकार्यात अनेक अडथळे आले. अनेक तासाच्या प्रयत्नानंतर ही मृतदेह सापडला नाही. सोमवारी सकाळी वालीवली परिसरात या तरुणाचा मृतदेह वाहत आल्याचे स्थानिकांना समजले. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत या तरुणाचा मृतदेह २४ तासानंतर बाहेर काढला. मृतदेह बदलापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.