प्रेमसंबंध तोडल्याने तरुणाची विद्यार्थिनीला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 05:32 IST2020-01-08T05:32:17+5:302020-01-08T05:32:24+5:30

प्रेमसंबंध उघड झाल्यानंतर १९ वर्षाच्या महाविद्यालयीन विद्यार्थीनीनेही प्रेमसंबंध तोडल्याने चिडलेल्या तरूणाने महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा बाहेरच तीला मारहाण केली.

Young girl kills student for breaking love affair | प्रेमसंबंध तोडल्याने तरुणाची विद्यार्थिनीला मारहाण

प्रेमसंबंध तोडल्याने तरुणाची विद्यार्थिनीला मारहाण

मीरा रोड : दुसऱ्या मुलीशी असलेले प्रेमसंबंध उघड झाल्यानंतर १९ वर्षाच्या महाविद्यालयीन विद्यार्थीनीनेही प्रेमसंबंध तोडल्याने चिडलेल्या तरूणाने महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा बाहेरच तीला मारहाण केली. तीला सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या विद्यार्थ्यासही त्याने व मित्रांनी मारले. या प्रकरणी तरुणास पोलीसांनी अटक केली असून त्याच्या तीघा साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.
नवघर येथे असलेल्या महाविद्यालयासमोर मंगळवारी सकाळी घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. ही विद्यार्थीनी गेल्यावर्षी वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षात असताना तिसºया वर्षात असणाºया विनीत पाटील (२०) याने तिच्याशी ओळख केली.
पुढे दोघांमध्ये प्रेम संबंध जुळले. परंतु गेल्या वर्षीच्या नवरात्रोत्सवात विनीत व ती तरुणी बोलत असताना एका मुलीने येऊन विनीतशी आपले प्रेमसंबंध असल्याचे उघड केले. आपली फसवणूक झाल्याचे कळल्यावर त्या विद्यार्थीनीने
विनीतशी संबंध तोडले होते. परंतु विनीत मात्र तीचा सारखा पाठलाग करायचा.
मंगळवारी सकाळी विनीत पाठलाग करत महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहचला. तेथे जाऊन त्याने तीने भेट म्हणून दिलेले शर्ट व रिंग तीला परत केली व विनीतने
तीचा गळा धरुन कानाखाली
मारली. यावेळी तीचा सहकारी विद्यार्थी सोडवण्यास मध्ये पडला असता विनीतने व त्याच्या तीन
मित्रांनी त्याला बेदम मारहाण
केली. या प्रकरणी नवघर
पोलिसांनी विनीत याला अटक केली आहे.

Web Title: Young girl kills student for breaking love affair