Ulhasnagar: उल्हासनगरातील रिजेन्सी मैदानात योगा दिवस
By सदानंद नाईक | Updated: June 21, 2023 17:43 IST2023-06-21T17:42:52+5:302023-06-21T17:43:48+5:30
Yoga Day In Ulhasnagar: जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून भाजपच्या वतीने रिजेन्सी मैदानात योगा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन स्वामी देवप्रकाश महाराज, ब्राह्मकुमारी आश्रमाच्या पुष्पा दीदी, मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार कुमार आयलानी आदींच्या हस्ते बुधवारी सकाळी झाले.

Ulhasnagar: उल्हासनगरातील रिजेन्सी मैदानात योगा दिवस
- सदानंद नाईक
उल्हासनगर : जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून भाजपच्या वतीने रिजेन्सी मैदानात योगा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन स्वामी देवप्रकाश महाराज, ब्राह्मकुमारी आश्रमाच्या पुष्पा दीदी, मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार कुमार आयलानी आदींच्या हस्ते बुधवारी सकाळी झाले.
उल्हासनगर कॅम्प नं-१ येथील रिजेन्सी अंटेलिया येथील मैदानात २१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिवसाचे औचित्य साधून आमदार कुमार आयलानी यांनी योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात शहरातील विविध २८ योगा संस्था, ८ शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे उदघाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, स्वामी देवप्रकाश महाराज व ब्राहमकुमार आश्रमच्या पुष्पा दीदी व कुमार आयलानी यांच्या हस्ते झाले. तसेच शहरातील विविध ठिकाणी व शाळेत योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.