भिवंडी डाईंग कंपनीच्या रोलिंग मशीनमध्ये अडकल्याने कामगाराचा मृत्यू
By नितीन पंडित | Updated: September 22, 2023 15:39 IST2023-09-22T15:39:16+5:302023-09-22T15:39:53+5:30
अजय नरेश मिश्रा वय २४ वर्ष असे कपडा प्रेस करणाऱ्या रोलिंग मशीन मध्ये अडकून मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. म

भिवंडी डाईंग कंपनीच्या रोलिंग मशीनमध्ये अडकल्याने कामगाराचा मृत्यू
भिवंडी : डाईंग कंपनीतील कपडा प्रेस करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रोलिंग मशीन मध्ये अडकल्याने कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शेलार येथील खेमिसती डाईंग कंपनीत गुरुवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अजय नरेश मिश्रा वय २४ वर्ष असे कपडा प्रेस करणाऱ्या रोलिंग मशीन मध्ये अडकून मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. मयत अजय हा शेलार येथील खेमीसती डाईंग कंपनीत कपडा प्रेस करणाऱ्या रोलिंग मशीन वर काम करत होता काम करत असताना अचानक अजय याचा हात रोलिंग मशीन मध्ये अडकल्याने तो कपड्यासह मशीन मध्ये अडकला होता ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.या मृत्यू प्रकरण मयत अजय याचा सहकारी कामगार सुनील राम चौथीराम वय ४० वर्ष याचा सांगण्यावरून या मृत्यू बाबत कोणताही संशय नसून कोणावरही काही एक तक्रार नसल्याची खबर तालुका पोलिसांना दिली आहे.
या अपघाती मृत्यू प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. तपासात जो कोणी दोषी असेल, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांनी दिली आहे.