शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मोठागाव ठाकुर्ली-माणकोली पुलाचे काम रखडले

By admin | Updated: January 28, 2017 02:37 IST

मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडीपुलाचे चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होऊनही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात

डोंबिवली : मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडीपुलाचे चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होऊनही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. कामाच्या ठिकाणी साहित्य आले आहे. मात्र, पुलासाठी जमीन संपादितच न झाल्याने कामाला प्रारंभ होऊ शकलेला नाही. त्यामुळे त्याला मुहूर्त कधी मिळणार, असा सवाल शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केला आहे. यासंदर्भात म्हात्रे यांनी एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. मोठागाव ठाकुर्ली ते माणकोली या खाडीपुलाच्या कामाचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते १८ सप्टेंबर २०१६ ला झाले. एमएमआरडीए २२६ कोटी रुपये खर्चून हा सहापदरी पूल उभारत आहे. या पुलाच्या कामाच्या भूमिपूजनावरून शिवसेना-भाजपा आमने-सामने आले होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होण्यापूर्वीच शिवसेनेने या कामाचे भूमिपूजन करून राजकीय धुराळा उडवून दिला होता. मात्र, कामाचे भूमिपूजन होऊन चार महिने उलटले, तरी अद्याप कामाला एक इंचही सुरुवात झालेली नाही. कामासाठी कामाच्या ठिकाणी साहित्य येऊन पडले आहे. पुलाच्या डोंबिवलीकडील ठाकुर्ली मोठागावची जागा, तर पलीकडे भिवंडी भागातील जागा अद्याप संपादित झालेली नाही. काही जागा ही सीआरझेडमध्ये येते. शेतकऱ्यांनी जमीन संपादनाला विरोध केला आहे. जमीन संपादित झालेली नसताना भूमिपूजन लवकर उरकले गेले. त्यामुळे काम रखडले आहे. महापालिका आयुक्तांनी जमीन बाधितांना नोटिसा पाठवल्या आहेत. मात्र, त्यांना मोबदला हवा आहे. आयुक्तांच्या मते बाधितांनी प्रथम जमीन द्यावी. मग, मोबदल्याचा विचार केला जाईल. एमएमआरडीएच्या मते आम्ही प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. कंत्राटदार नेमला आहे. जमीन संपादन हा भाग महापालिकेचा आहे. प्रकल्पाला उशीर झाल्यावर एमएमआरडीएला त्याचा फटका सहन करावा लागणार आहे. प्रकल्प वेळेत सुरू होऊन पूर्ण झाला नाही, तर प्रकल्पाच्या खर्चाची रक्कम वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पुलाशी कल्याण-डोंबिवलीचा रिंगरूट संबंधित आहे. पूल तयार होत नसल्याने रिंगरूटलाही बाधा येत आहे. रिंगरोड हा ८०० कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्पही एमएमआरडीए उभारेल, असे मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमात स्पष्ट केले होते. (प्रतिनिधी)