शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एकमेकांसोबत समन्वय साधून काम करा; महायुती पदाधिकारी मेळाव्यात नेते मंडळींचा सल्ला

By अजित मांडके | Updated: August 14, 2024 18:17 IST

ठाण्यातूनच पहिली प्रचार यात्रा निघणार असून पालघर नवीमुंबई अशी ही यात्रा असणार आहे.

ठाणे -  विधानसभा निवडणुकीला सामोरे जातांना यातील जे प्रमुख नेते आहेत, त्यांचे तोंडे विरुध्द दिशेला असू नयेत, त्यांची तोंड एकमेकांसमोर असायला हवीत असा सल्ला माजी खासदार कपील पाटील यांनी शनिवारी महायुतीच्या झालेल्या बैठकीत दिला. तसेच जो काही फेक नरेटीव्ह सेट केला जात आहे, तो सोशल मिडियाच्या माध्यमातून खोडून काढा असे आवाहन प्रसाद लाड यांनी यावेळी केले. तसेच लोकसभा निवडणुकीत जे झाले ते आता न करता एकमेकांसमोबत समन्वय साधून काम करा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

ठाण्यात टिप टॉप येथे बुधवारी सकाळी महायुतीचा समन्वयक मेळावा पार पडला. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक तसेच कोकणचे विभागाचे समन्वयक उद्योगमंत्री उदय सामंत, प्रसाद लाड, आमदार गणेश नाईक, अनिकेत तटकरे, खासदार नरेश म्हस्के, डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार कपिल पाटील आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीच्या माध्यमातून येत्या २४ ऑगस्ट पासून प्रचार यात्रेला सुरवात होणार असल्याची माहिती प्रसाद लाड यांनी दिली.

ठाण्यातूनच पहिली प्रचार यात्रा निघणार असून पालघर नवीमुंबई अशी ही यात्रा असणार आहे. एकजूट महाराष्टासाठी अभियान विकासासाठी कल्याणासाठी हे घोषवाक्य घेऊन महायुती राज्यभर प्रचार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच सोशल मिडिया आर्मी तयार करुन त्या माध्यमातून महाविकास आघाडीकडून जो काही फेक नरेटीव्ह सेट केला जात आहे. त्याला या आर्मीच्या माध्यमातून उत्तर दिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेला फेक नरेटीव्ह सेट करण्यात आला होता. त्यामुळे तो फेक नरेटीव्ह खोडण्यासाठी आपण एकत्र असणे गरजेचे असल्याचे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.  

समन्वय साधला तरच पुढचा काळ चांगला आहे,लोकसभेत वाद झाले नव्हते. परंतु तिकीट वाटपला उशीर झाला होता. आता तसे होणार नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षातील वरीष्ठ नेते ठरवतील असेही त्यांनी सांगितले.  कोकणात ७४ जागा असून त्या सर्वच जागा महायुती लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले आणि त्याचा स्ट्राईक रेट हा ८५ टक्के पेक्षा पुढे असेल असा दावाही त्यांनी केला.

महायुतीच्या मेळाव्यातून आपण काय घेऊन जाणार आहोत हे महत्वाचे आहे. असे मेळावे घेण्यापेक्षा ज्यांची तोंड बघून लोक मत देतात त्यांची तोंडे एका दिशेने घ्या असा सल्ला माजी खासदार कपिल पाटील यांनी दिला. लोकसभेत ज्या चुका झाल्या त्या विधानसभेत होऊ नये, महायुतीचे सरकार हे महाराष्ट्राची गरज झाली आहे. गलती करो, बार बार करो, पर एक गलती बार बार मत करो असे सांगतांनाच एकमेकांच्या संख्या कमी करु नका अशा कानपिचक्या त्यांनी यावेळी दिल्या. कार्यकर्ते म्हणतात तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे कधी तरी म्हणा महायुती आगे बढो हम तुम्हारे साथ हे असेही ते म्हणाले. तर सव्वा दोन वर्षे या सरकारला झाली तरी सुध्दा लोकांना सांगाव लागत आहे, हे परिस्थिती योग्य नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मायक्रो लेव्हलला लोकांचे प्रेम महायुतीवर कमी झाले आहे, घडलेल्या चुकांचा हा रिझल्ट आहे. कोण म्हणत चुका घडल्या नाहीत. परंतु आता त्यातून सुधारुन काठावर यश नको घवघवीत यश हवे असल्याने त्यासाठी एकजूट हवी असा सल्ला आमदार गणेश नाईक यांनी दिला.

लोकसभेत ठाणे, पालघर कल्याण या तीन जागा निवडून आल्या. परंतु भिवंडीचा जागा पडली. परंतु विधानसभा निवडणुकीत अशा चुका होता कामा नये असा सल्ला खासदार नरेश म्हस्के यांनी दिला. विरोधकांकडून केवळ नरेटीव्ह पसरवले जात आहे. परंतु हा नरेटीव्ह खोडून काढणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

एकच गमछा महायुतीचानिवडणुकीत प्रत्येक पक्ष हा वेगवेगळा गमछा घालून प्रचार करीत असतो. त्यातून काही वेळेस महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये भांडणे देखील होतात. मात्र आता महायुतीचा एकच गमछा ठेवा आणि त्यावर तीनही पक्षांचे चिन्ह ठेवा असा सल्लाही यावेळी देण्यात आला.

टॅग्स :MahayutiमहायुतीUday Samantउदय सामंतGanesh Naikगणेश नाईकnaresh mhaskeनरेश म्हस्केShiv SenaशिवसेनाBJPभाजपा