शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

कौतुकास्पद! एक्स्प्रेसमध्ये विसरलेली बॅग रेल्वे प्रशासनाच्या तत्परतेने सापडली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 10:11 PM

दोन लाखांचे सोन्याचे दागिने आणि इतर वस्तूंची असलेली बॅग चेंबूरमधील छाया शेळके ही तरुणी तुतारी एक्स्प्रेसमध्ये विसरली.

ठाणे: दोन लाखांचे सोन्याचे दागिने आणि इतर वस्तूंची असलेली बॅग चेंबूरमधील छाया शेळके ही तरुणी तुतारी एक्स्प्रेसमध्ये विसरली. ती बॅग रेल्वे प्रशासनाच्या तत्परतेने अवघ्या तासांमध्ये त्या तरुणीला ठाणे रेल्वे स्थानकात स्टेशन उपप्रबंधक रवि नांदूरकर यांनी गुरुवारी सकाळी परत केली. चेंबूर येथे राहणा-या छाया शेळके या आई-वडिलांसह कोकणात लग्नासाठी गेल्या होत्या. बुधवारी रात्री ते तिघे तुतारी एक्स्प्रेसने मुंबईकडे येण्यास निघाले.वैभववाडी येथून बसल्यावर गुरुवारी पहाटे ते तिघे पनवेल येथे चेंबूरला जाण्यासाठी उतरले. दरम्यान इतर वस्तू जास्त असल्याने ते गाडीतून उतरवताना झालेल्या घाईगडबडीत एक बॅग हे कुटुंब एक्स्प्रेसमध्ये विसरले. गाडी सुटल्यावर खांद्यातील बॅग दिसत नसल्याचे लक्षात येतात. त्यांनी पनवेल रेल्वे प्रबंधक कार्यालयात धाव घेत, बॅग एक्स्प्रेसच्या डब्यात राहिल्याची माहिती दिली. तातडीने पनवेल रेल्वे प्रशासनाने ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयात फोन करून माहिती दिली. त्यानुसार ठाण्यातील पाईंटमन मनोहर कुमार याने ठाण्यात गाडी आल्यावर सांगितलेल्या डब्ब्याची तपासणी केल्यावर सुदैवाने कोणीही बॅग न नेल्याने गाडीत मिळून आल्याची माहिती पनवेल प्रंबधक कार्यालयाला दिली.शेळके या ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयात आल्यावर त्यांची बॅग त्यांच्या खातरजमा झाल्यानंतर स्वाधीन केली. त्या बॅगेत एक नेकलेस, दोन बांगड्या आणि दोन अंगठ्या असा अंदाजे दोन लाखांचा सोन्याचा ऐवज आणि इतर वस्तू ठाणे आरपीएफ जवान प्रदीपकुमार यांच्या समोर दिल्याची माहिती उपप्रबंधक नांदूरकर यांनी दिली. बॅग मिळाल्याबाबत शेळके कुटुंबीयांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले.

टॅग्स :passengerप्रवासी