शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

लोकमतचा दणका; मुदत संपलेल्या महिला बालकल्याण समितीचा नेपाळ दौरा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 21:10 IST

१५ नगरसेविका असलेल्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती पदी भाजपाच्या दिपीका अरोरा तर उपसभापती पदी भाजपाच्याच वंदना भावसार होत्या.

मीरारोड - समितीची संपलेली मुदत आणि अभ्यासाच्या नावाखाली नेपाळ या पर्यटन स्थळी १५ लाखांचा खर्च करुन चाललेली महिला बालकल्याण समितीची टूरटूर अखेर लोकमतच्या बातमी नंतर रद्द केली गेली आहे. ३० नोव्हेंबर रोजी सर्वात आधी लोकमतने नेपाळ टुरची बातमी दिली होती आणि त्याच दिवशी पालिकेने समितीची मुदत संपली असल्याने दौरा रद्द केल्याची प्रशासकिय टिप्पणी मंजुर केली.१५ नगरसेविका असलेल्या महिला बालकल्याण समिती च्या सभापती पदी भाजपाच्या दिपीका अरोरा तर उपसभापती पदी भाजपाच्याच वंदना भावसार होत्या. भाजपाचा वरचष्मा असलेल्या सदर समितीतील भाजपा, शिवसेना व काँग्रेस नगरसेविकांनी मिळुन अभ्यास दौरा काढण्याचा ठराव जुलै मध्ये केला होता. परंतु समितीची मुदत आॅक्टोबर मध्ये संपलेली असताना देखील नोव्हेंबर मध्ये नेपाळ दौरायासाठी निवीदा मागवण्यात आल्या होत्या. केएसव्ही टुर्स एण्ड ट्रावेल्स, हेझल ट्रावेल्स एण्ड टुर्स व युक्ता हॉलीडे एण्ड इव्हेन्टस या तीन ठेकेदारांनी निवीदा भरल्या.मात्र समितीची संपलेली मुदत आणि नेपाळ हा दुसरा देश असल्याने या आधी देखील पालिकेची परदेश दौरा करता येत नसल्याची भुमिका पाहता सदर प्रकार लोकमत ने ३० नोव्हेंबर रोजी उघडकीस आणला होता. सदर बातमी मध्ये प्रतिक्रीया देताना आयुक्त बालाजी खतगावकर यांनी स्वत:च, समितीची मुदत संपली असल्याने दौरा मंजुर करण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले होते. तर माजी सभापती असलेल्या अरोरा यांनी देखील प्रतिक्रीये मध्ये, आपण दौरा रद्द करण्याचे पत्र देऊ असे म्हटले होते. त्या अनुषंगाने अरोरा यांनी पत्र देखील दिले. काँग्रेसने दौरायाचा ठराव केल्याचे सांगुन हात झटकण्याचा प्रयत्न अरोरा यांनी केला होता.वास्तविक अभ्यासाच्या नावाखाली आता पर्यंत नगरसेवक व अधिकारायांचे दौरे हे पर्यटन स्थळीच काढले गेले आहेत. करदात्या जनतेच्या पैशांवर हे नगरसेवक पर्यटन स्थळी मौजमजा करत असल्याचे प्रकार अनेकवेळा उघडकीस आलेले आहेत. पर्यटन ठिकाणीच हे दौरे काढले जात असल्याने आज पर्यंत शहराला या दौरायांचा काहीच उपयोग झाला नसुन दिवस निहाय अहवाल देखील सादर केले गेलेले नाहित.लोकमतमध्ये ३० नोव्हेंबर रोजी सदरचे वृत्त प्रसिध्द होताच त्याच दिवशी पालिका प्रशासनाने समितीची मुदत संपलेली असल्याने नेपाळ दौरा रद्द करण्याचा प्रस्ताव तयार केला. शिवसेनेच्या अर्चना कदम यांनी, ठरावात नेपाळला जाण्याचा विषयच नसताना हे परस्पर कोणी ठरवले ? असा सवाल करत दौरायास विरोध केला. तर काँग्रेसच्या गीता परदेशी यांनी देखील बहुमत असणाराया भाजपाने चलाखीने आयत्या वेळी आपल्याला ठराव वाचण्यास दिला असला तरी त्यात नेपाळ दौरायाचा उल्लेखच नव्हता असे स्पष्ट करत भाजपावर झोड उठवली. भाजपाच्या काही सदस्य नगरसेविका देखील समितीची मुदत संपलेली असताना आम्हाला नेपाळ दौरायाला जायचे असल्याचे सांगण्यात आल्याच्या प्रकारा बद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकNepalनेपाळMira Bhayanderमीरा-भाईंदर