कोपरीतील शरीर विक्रयाचा व्यवसाय बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा महिलांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 23:53 IST2020-10-18T23:47:10+5:302020-10-18T23:53:32+5:30

ठाणे पूर्व कोपरी येथील रेल्वे स्थानक परिसरात मोठया प्रमाणावर काही महिला शरीरविक्रयाचा व्यवसाय करतात. त्याचा नाहक त्रास येथील स्थानिक महिलांना सोसावा लागत आहे. हा अनैतिक व्यवसाय बंद झाला नाही तर कोपरी पोलीस ठाण्यावर महिलांचा मुक मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपने दिला आहे.

Women warn of intense agitation if prostitution business in the corner is not stopped | कोपरीतील शरीर विक्रयाचा व्यवसाय बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा महिलांचा इशारा

कोपरी पोलीस ठाण्यात दिले निवेदन

ठळक मुद्देकोपरी पोलीस ठाण्यात दिले निवेदन स्थानिक महिलांची कुचंबना

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे पूर्व कोपरी येथील रेल्वे स्थानक परिसरात मोठया प्रमाणावर काही महिला शरीरविक्रयाचा व्यवसाय करतात. त्याचा नाहक त्रास येथील स्थानिक महिलांना सोसावा लागत आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांमध्ये कोपरीतील हा अनैतिक व्यवसाय बंद झाला नाही तर कोपरी पोलीस ठाण्यावर महिलांचा मुक मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिला आहे.
कोपरी येथील स्टेशन परिसरात लॉकडाऊन नंतर मोेठया प्रमाणावर काही बाहेरुन येणाऱ्या महिला देहविक्रीचा व्यवसाय करीत आहेत. त्यासाठी त्या येणाºया जाणाºया पुरुषांकडे हात वारे करीत इशारे करतात. रेल्वे स्थानक मार्गावर उभ्या राहणाºया या महिलांमुळे स्थानिक महिलांची कुचंबना होते. याप्रकरणी स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांच्याकडे स्थानिक रहिवाशांनी तक्रारी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांच्यासह काही महिलांच्या शिष्टमंडळाने कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगारकर यांना निवेदन दिले. येत्या आठ दिवसात येथील हा अनैतिक व्यवसाय बंद झाला नाही तर महिलांचा मुक मोर्चा काढून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Web Title: Women warn of intense agitation if prostitution business in the corner is not stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.