कल्याणमध्ये महिला पोलिसाला मारहाण
By Admin | Updated: September 28, 2016 20:38 IST2016-09-28T20:38:52+5:302016-09-28T20:38:52+5:30
महिला पोलीसाला मारहाण करून पोलिसांना शिवीगाळ करीत धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात घडला

कल्याणमध्ये महिला पोलिसाला मारहाण
ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. 28 - गेल्या काही दिवसांपासून पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांच्या घटना समोर आल्या आहेत. कल्याणमध्ये कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन डगळे यांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या एका महिलेने महिला पोलिसाला मारहाण केली आहे. एवढ्यावरच न थांबता त्या महिलेनं चक्क पोलीस स्टेशनमध्येच धिंगाणा घातला असून पोलिसांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात घडला. याप्रकरणी हिना अन्सारी या महिलेवर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.