पोस्ट कार्यालयात महिलेचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:40 IST2021-07-31T04:40:39+5:302021-07-31T04:40:39+5:30

डोंबिवली : पूर्वेतील टिळकनगर पोस्ट कार्यालयात कल्पना पाटील ऊर्फ देशमुख हिने गोंधळ घालत तेथील महिला कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार ...

A woman's confusion at the post office | पोस्ट कार्यालयात महिलेचा गोंधळ

पोस्ट कार्यालयात महिलेचा गोंधळ

डोंबिवली : पूर्वेतील टिळकनगर पोस्ट कार्यालयात कल्पना पाटील ऊर्फ देशमुख हिने गोंधळ घालत तेथील महिला कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला. याप्रकरणी दीपाली साकरे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसात देशमुख हिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोस्ट कार्यालयात आलेल्या देशमुख हिने तेथील कर्मचाऱ्यांना, माझे पार्सल आले आहे का? अशी विचारणा केली. यावर तेथील महिला कर्मचाऱ्याने थोडा वेळ थांबा, असे सांगितले असता ‘माझे काम आधी करा, तुम्ही सरकारी कर्मचारी असून काहीही काम करीत नाहीत,’ असे रागाच्या भरात ती बोलली. तसेच काऊंटरला असलेले ॲल्युमिनिअमचे गज तोडून ते कर्मचाऱ्यांच्या अंगावर फेकून मारू लागली. देशमुख हिला कर्मचाऱ्यांनी समजाविण्याचा प्रयत्न केला असता ती त्यांच्या अंगावर धावून गेली. तसेच धक्काबुक्की केली, अशी तक्रार साकरे यांनी पोलिसात दिली आहे.

----------------

Web Title: A woman's confusion at the post office