गॅस वाहिनीतील गळतीमुळे लागलेल्या आगीत महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 11:20 PM2021-06-23T23:20:39+5:302021-06-23T23:22:01+5:30

सिलेंडर आणि स्टोव्ह यांच्यामध्ये असलेल्या गॅस वाहिनीतील गळतीमुळे लागलेल्या आगीत कल्पना नार्वेकर (६५) ही वृद्ध महिला होरपळून जखमी झाल्याची घटना कळवा मनिषानगर येथे बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

A woman was injured in a fire caused by a leak in a gas pipeline | गॅस वाहिनीतील गळतीमुळे लागलेल्या आगीत महिला जखमी

कळव्यातील घटना

Next
ठळक मुद्दे कळव्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: सिलेंडर आणि स्टोव्ह यांच्यामध्ये असलेल्या गॅस वाहिनीतील गळतीमुळे लागलेल्या आगीत कल्पना नार्वेकर (६५) ही वृद्ध महिला होरपळून जखमी झाल्याची घटना कळवा मनिषानगर येथे बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. ती ४० टक्के भाजली असून तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
मनिषा नगर गेट क्रमांक तीन शकुंतला बिल्डींग मधील तळमजल्यावर राहणारी ही महिला घरात एकटीच होती. त्यावेळी गॅस वाहिनीतील गळतीमुळे अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दलासह टोरंट वीज कंपनीचे कर्मचारी आणि ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आदींनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतराने ही आग आटोक्यात आली. या घटनेत कल्पना यांच्या पाठीला आणि दोन्ही हातांना भाजले. त्यांना उपचारासाठी कृष्णाई केअर मेडिक्लिनिक या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील भारत गॅसचे सिलेंडर हे अग्निशमन दलाच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

Web Title: A woman was injured in a fire caused by a leak in a gas pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.