शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

महिलेची प्रसूती मेणबत्तीच्या प्रकाशात; डॉक्टरांची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 02:52 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आदिवासी, दुर्गम आणि ग्रामीण भागांतील गावपाड्यांमध्ये आरोग्यसेवा दिली जाते. मात्र, जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (पीएचसी) १९२ डॉक्टरांची तसेच सोयीसुविधांची कमतरता असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आदिवासी, दुर्गम आणि ग्रामीण भागांतील गावपाड्यांमध्ये आरोग्यसेवा दिली जाते. मात्र, जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (पीएचसी) १९२ डॉक्टरांची तसेच सोयीसुविधांची कमतरता असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. बापसई आरोग्य केंद्रात तर विद्युतपुरवठा नसल्यामुळे महिलेची प्रसूती मेणबत्तीच्या प्रकाशात करावी लागल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.जिल्ह्यातील ३४ पीएचसींमध्ये एमबीबीएस, बीएएमएस डॉक्टरांद्वारे रुग्णांना सेवा दिली जाते. पाच पीएचसी बांधायच्या असून त्यासाठी जागा उपलब्ध नाही. गावपाड्यांच्या रुग्णांवरील उपचारासाठी ६७३ डॉक्टरांची पदे भरण्यास मंजुरी आहे. यापैकी ४४५ डॉक्टर भरती केले आहेत. उर्वरित १९२ डॉक्टरांची पदे रिक्त असल्यामुळे उपचारांमध्ये अडथळा निर्माण होत आहे. बहुतांश ठिकाणी रुग्णांवर वेळीच प्राथमिक उपचार होत नसल्यामुळे त्यांना गंभीर आजारास तोंड द्यावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत.पीएचसीमध्ये सोयी सुविधांचादेखील अभाव आहे. बापसई आरोग्य केंद्रात तर विद्युतपुरवठा नसल्यामुळे महिलेची प्रसूती मेणबत्तीच्या प्रकाशात करावी लागली. या गंभीर समस्यांना पायबंद घालण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सौरऊर्जेद्वारे विद्युतपुरवठा करण्यासाठी तरतूद करण्याची मागणी जि.प. सदस्य सुभाष घरत यांनी लावून धरली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यासारख्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी कल्याणजवळील गोवेली रुग्णालय सोयीसुविधायुक्त करून सुरू करण्याची मागणी आहे. शहापूर परिसरातील शेंद्रुण व वडाचापाडा, सपारपाडा येथील ग्रामस्थांना तर गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या चार केंद्रांचा निधीदेखील पडून असल्याचे कल्याणचे सभापती सांगतात.नवघर, पडघा येथे लाखो रुपये खर्चून आरोग्य केंद्रे बांधली आहेत. पण, डॉक्टर नसल्यामुळे या इमारती वापराविना पडून असल्याचे जि.प. सदस्य कुंदन पाटील यांनी उघड केले. २७ गावे परिसरांसाठी नेवाळी पीएचसी उपयुक्त आहे. पण, ते सध्या नवी मुंबई महापालिकेकडून जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले नाही.जागा विकतघेण्याची हवी तरतूदजिल्ह्यात ठिकठिकाणी आरोग्य केंद्रांना मंजुरी दिलेली आहे. पण, बहुतांश आरोग्य केंद्रे जागेअभावी उभी राहत नसल्याचे दिसून आले. या आरोग्य केंद्रांसाठी सधन व्यक्तीने त्याची जागा दान करण्याची शासनाची अपेक्षा आहे. पण, जागेच्या किमती पाहता आता कोणीही जागा देण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे आरोग्य केंद्रांचा निधी पडून आहे. यावर मात करण्यासाठी जागा विकत घेण्याची परवानगी शासनाकडून मिळवण्याचा सल्ला मुरबाडचे सदस्य बांगर यांनी दिला.७५ टक्के एमबीबीएस डॉक्टरांची गरजडॉक्टरांसह विविध सोयीसुविधांअभावी कुंदे येथील पीएचसी बंद आहे. जिल्ह्यातील रुग्णांवर परिपूर्ण उपचार व्हावे, यासाठी आरोग्य केंद्रांमध्ये ७५ टक्के एमबीबीएस डॉक्टर व २५ टक्के बीएएमएस डॉक्टर उपलब्ध करण्याचा नियम आहे. पण, डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग चर्चेत आहे.

टॅग्स :thaneठाणे