मोटारकारच्या धडकेत महिलेचा मृत्यू: दोन जखमी
By जितेंद्र कालेकर | Updated: July 11, 2023 00:10 IST2023-07-11T00:10:37+5:302023-07-11T00:10:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : एका उभ्या असलेल्या मोटारकारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पूजा कृष्णाजी सावंत (वय 53, रा. ...

मोटारकारच्या धडकेत महिलेचा मृत्यू: दोन जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एका उभ्या असलेल्या मोटारकारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पूजा कृष्णाजी सावंत (वय 53, रा. निळकंठ हाईट्स, ठाणे) या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी मद्यपी कार चालक दिवाकर शर्मा याला ताब्यात घेतल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.
शास्त्रीनगर ते देवदया मार्गावरून पूजा घरी जात होत्या. त्याचवेळी शर्मा याच्या कारने एका उभ्या मोटारीला धडक दिली. या दोन्ही कारच्यामध्ये पूजा चेंगरल्या गेल्या. यात त्यांच्या पायाचे हाड मोडले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अन्यही दोनमहिला जखमी झाल्या आहेत. मोटारकार चालक शर्मा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.