हाजीमलंग पहाडीत गळा घोटून महिलेचा खून

By सदानंद नाईक | Updated: October 28, 2023 14:38 IST2023-10-28T14:38:38+5:302023-10-28T14:38:48+5:30

हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाजीमलंग पहाडच्या झाडाझुडुपात एका महिलेचा मृतदेह गळा घोटलेल्या स्थितीत आढळून आला.

Woman killed by strangulation in Hajimalang hill | हाजीमलंग पहाडीत गळा घोटून महिलेचा खून

हाजीमलंग पहाडीत गळा घोटून महिलेचा खून

सदानंद नाईक

 उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाजीमलंग पहाडच्या झाडाझुडुपात एका महिलेचा मृतदेह गळा घोटलेल्या स्थितीत आढळून आला. या प्रकरणी अज्ञात इसमा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.

 उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाजीमलंग पहाडीत फेनिक्युलर रोप वे च्या पुढील मुंढे हॉटेल जवळील झाडाझुडुपांमध्ये एका २५ ते ३० वयोगटातील महिलेचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजता नागरिकांना दिसला. याबाबतची माहिती हाजी मलंगवाडीचे पोलिस पाटील जयंत पाटील यांनी हिललाईन पोलिसांना दिल्यावर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात उत्तर तपासणीसाठी पाठवून दिला.

महिलेचा गळा घोटून खून केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त करून अज्ञात इसमावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित ढेरे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Woman killed by strangulation in Hajimalang hill