क्षुल्लक कारणावरून महिलेला पेटविले

By Admin | Updated: May 10, 2017 00:06 IST2017-05-10T00:06:03+5:302017-05-10T00:06:03+5:30

मोबाइल व घर न सोडण्याच्या क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नीला भररस्त्यात अंगावर रॉकेल ओतून पेटविले. महिला ७० टक्क्यापेक्षा

The woman got burnt to a minor cause | क्षुल्लक कारणावरून महिलेला पेटविले

क्षुल्लक कारणावरून महिलेला पेटविले

लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : मोबाइल व घर न सोडण्याच्या क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नीला भररस्त्यात अंगावर रॉकेल ओतून पेटविले. महिला ७० टक्क्यापेक्षा जास्त भाजली असून मध्यवर्ती रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. संतोषकुमार शेख याच्याविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
खेमानी परिसरातील आझादनगर येथे संतोषकुमार शेख पत्नी शमीसोबत राहतो. कुटुंब चालविण्यासाठी शमी कॅम्प नं-३ अंबरनाथ-कल्याण रस्त्यावरील ब्ल्यू बेरी लॉज येथे काम करते. सोमवारी सायकांळी संतोषकुमार ब्ल्यू बेरी लॉजमध्ये गेला. मोबाइल देण्यावरून व घर सोडून न जाण्यावरून दोघात भांडण झाले. रागाच्या भरात शमी लॉजच्या खाली उतरताच, संतोषकुमारने रॉकेल शमीच्या अंगावर ओतून भररस्त्यात पेटवले. शमी अशा परिस्थितीत पळत सुटली. दुकानादारांनी पाणी टाकून आग विझविली. तसेच पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी ७० टक्क्यापेक्षा अधिक जळालेल्या शमीला मध्यवर्ती रूग्णालयात दाखल केले.

Web Title: The woman got burnt to a minor cause