शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

ठाणे रेल्वे स्थानकातील क्लिनिकमध्ये महिलेची प्रसूती, मुलीचा जन्म 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 9:40 AM

ठाणे रेल्वे स्थानकातील क्लिनिकमध्ये महिलेची प्रसूती झाली असून आई आणि बाळ दोन्ही सुखरूप आहेत.

पंकज रोडेकर  

ठाणे - ठाणे रेल्वे स्थानकातील क्लिनिकमध्ये महिलेची प्रसूती झाली असून आई आणि बाळ दोन्ही सुखरूप आहेत. प्रसूतीसाठी रुग्णालयात भरती होण्यासाठी जात असताना एका 23 वर्षीय विवाहितेला लोकल प्रवासादरम्यान प्रसूती वेदना सुरु झाल्याने त्या ठाणे रेल्वे स्थानकात उतरल्या. त्यानंतर स्थानकावरील वन रूपी क्लिनिकमध्ये त्यांची प्रसूती करण्यात आली असून त्यांनी एका मुलीला जन्म दिला. मंगळवारी (22 ऑगस्ट) रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मायलेकी सुखरूप असून उपचारासाठी त्यांना ठाणे सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वर्षभरातील ही तिसरी घटना आहे.      

हरजीत कौर (22) असे महिलेचे नाव असून ती दिवा येथील रहिवासी आहे. मंगळवारी रात्री प्रसूतीच्या वेदना सुरु होत असल्याने कळवा, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नातेवाईकांसह ती जात होती. लोकल प्रवासात वेदना जास्त होऊ लागल्याने तिला तातडीने ठाणे रेल्वे स्थानकावरील क्लिनिकमध्ये नातेवाईक, प्रवासी , रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने नेण्यात आले. हरजीतने एका गोंडस मुलीला जन्म दिला. 9 महीने पूर्ण झाल्यामुळे महिलेची नॉर्मल प्रसूती झाल्याची माहिती क्लिनिकचे डॉ. राहुल घुले यांनी दिली.या वर्षभरातील ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील ही तिसरी घटना आहे. याआधी कळवा आणि दिवा रेल्वे स्थानकात प्रसूतीच्या घटना घडल्या आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेhospitalहॉस्पिटल