भिवंडीत सेक्स रॅकेट चालविणाºया दलाल महिलेला अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: November 27, 2023 22:16 IST2023-11-27T22:15:51+5:302023-11-27T22:16:05+5:30

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई: चार पिडित तरुणींची सुटका

Woman broker arrested for running sex racket in Bhiwandi | भिवंडीत सेक्स रॅकेट चालविणाºया दलाल महिलेला अटक

भिवंडीत सेक्स रॅकेट चालविणाºया दलाल महिलेला अटक

ठाणे: भिवंडीत तरुणींना पैशाचे अमिष दाखवून त्यांच्याकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेणाºया एका दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी अटक केली. तिच्या तावडीतून चार पिडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

भिवंडीतील कल्याण भिवंडी रोडवर साईबाबा मंदिरजवळ एक दलाल महिला काही तरुणींकडून सेक्स रॅकेट चालवित असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे २७ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कल्याण भिवंडी रोड भागात बनावट गिºहाईकाला पाठवून या ठिकाणी सापळा लावून एका दलाल महिलेला चौधरी यांच्या पथकाने ताब्यात घेतले. या महिला दलाल आरोपीच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत चार तरुणींना उल्हासनगरच्या
महिला शासकीय शांतीसदन वसतिगृहात ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांिगतले.

Web Title: Woman broker arrested for running sex racket in Bhiwandi