शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

तरुणीला शरीरविक्रयास लावणा-या महिलेस अटक,पैशांचे आमिष : दोन दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 2:07 AM

पैशांचे आमिष दाखवून एका तरुणीला शरीरविक्रयास लावणा-या मंगल बागडे (रा. मनोरमानगर, ठाणे) या महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मंगळवारी अटक केली.

ठाणे : पैशांचे आमिष दाखवून एका तरुणीला शरीरविक्रयास लावणा-या मंगल बागडे (रा. मनोरमानगर, ठाणे) या महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मंगळवारी अटक केली.  तिला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.मानपाडा भागात एका महिलेकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करून घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे उपनिरीक्षक कल्याणी पाटील, जमादार राजू महाले, तानाजी वाघमोडे, हवालदार अविनाश बाबरेकर, विजय बडगुजर, नाईक नीशा कारंडे आदींच्या पथकाने १० आॅक्टोबर रोजी वाघबीळनाका, दलाल इंजिनीअरिंग वर्कसमोरील सार्वजनिक रस्त्यावरून पहाटेच्या सुमारास ही कारवाई केली. तिच्या ताब्यातून ३० वर्षीय पीडित महिलेचीही सुटका करण्यात आली आहे.बागडे हिच्याकडून तीन हजार ३८० ची रोकड आणि दोन मोबाइल असा ९ हजार ३८० चा ऐवज हस्तगत केला. तिच्याविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आणखी कोणती टोळी सामील आहे का? आणखी किती महिलांची तिने अशा प्रकारे फसवणूक केली.

टॅग्स :thaneठाणेArrestअटकCrimeगुन्हा