शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कोपरी-पाचपाखाडीत ४२,८४७ मतदार ओळखपत्राविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:59 PM

२५९ मतदानकेंद्र तळमजल्यावर; ३०० मतदारांचा मृत्यू

ठाणे : कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात नविन सहा हजार मतदारांची नोंदणी झाली आहे. तर ३०० मतदारांचा मृत्यू झाल्याने त्यांची नावे वगळण्यात आली. या मतदारसंघामध्ये तीन लाख ५१ हजार ५०९ मतदार आहेत. यातील ४२ हजार ८४७ मतदारांकडे निवडणूक ओळखपत्र नसून मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी जनजागृतीचा कार्यक्रम राबविणार असल्याची माहिती मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी उपेंद्र तामोरे यांनी वागळे इस्टेट, रामनगर, आयटीआयच्या कार्यशाळा क्रमांक एक येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.३१ आॅगस्ट २०१९ रोजी नव्याने प्रसिद्ध केलेल्या मतदारयादीनुसार या मतदारसंघामध्ये एक लाख ९३ हजार ७४ पुरुष, एक लाख ५८ हजार २९१ महिला, १३४ सैनिक तर दहा इतर अशा तीन लाख ५१ हजार ५०९ मतदारांची संख्या आहे. त्यातील ४२ हजार ८४७ मतदारांकडे निवडणूक ओळखपत्राचा अभाव आहे. सुमारे ८७ टक्के म्हणजे तीन लाख आठ हजार ८६२ मतदारांकडे निवडणूक ओळखपत्र असल्याचा दावाही तामोरे यांनी केला. मतदारयादीमध्ये तीन लाख पाच हजार १३८ मतदारांचे छायाचित्र आहे. तर ४६ हजार २३७ म्हणजे १३ टक्के मतदारांचे छायाचित्र यादीमध्ये नाही, असे या वेळी निवडणूक अधिकारी तामेरे यांनी सांगितले.एकूण ३७० मतदानकेंद्रवयोवृद्ध तसेच दिव्यांग मतदारांची गैरसोय होऊ नये यासाठी ३७० पैेकी २५९ मतदानकेंद्र ही तळमजल्यावर आहे. उर्वरित १५ पहिल्या, सहा दुसऱ्या तर ९० केंद्र ही मंडपामध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले. यातील ७८७ दिव्यांग मतदारांपैकी ७६६ मतदारांना तळमजल्यावर तर १७ मतदारांना पहिल्या आणि अवघ्या चार मतदारांना दुसºया मजल्यावर मतदानाची सुविधा केली आहे.तीन हजार ५०० मतदारांच्या नावात दुरुस्तीअलिकडेच १५ जुलै ते ३१ आॅगस्ट २०१९ या कालावधीमध्ये जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे मतदारयादीसाठी विशेष पुनर्रनिरीक्षण कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी सुमारे तीन हजार ५०० मतदारांनी सहा क्रमांकाचा अर्ज भरुन नावात दुरुस्ती केली. गेल्या सहा महिन्यात सुमारे ३०० मतदारांचा मृत्यू झाल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितल्यानुसार त्यांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहेत. तर सहा हजार नवयुवकांनी मतदार यादीमध्ये मतदानाचा हक्क बजविण्यासाठी नोंदणी केल्याचे तामोरे यांनी सांगितले.दोन हजार २२० कर्मचाऱ्यांची नियुक्तीया मतदारसंघात ३७० मतदानकेंद्र असून त्याठिकाणी निवडणूकीच्या कार्यक्रमासाठी मतदानकेंद्र अधिकारी कर्मचारी, शिपाई आणि पोलीस कर्मचारी असे दोन हजार २२० कर्मचारी याठिकाणी तैनात केले आहेत.आयटीआयमध्ये मतमोजणीरामनगर येथील आयटीआयच्या कार्यशाळेमध्ये कोपरी पाचपाखाडी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय असून त्याठिकाणी उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे, मतमोजणी आणि इव्हीएमच्या स्ट्राँगरुमची व्यवस्था करण्यात आली आहे.गडकरी रंगायतनमध्ये होणार प्रशिक्षणमतदान अधिकारी यांच्यासाठी २७ सप्टेंबर रोजी राम गणेश गडकरी रंगायतन येथे पहिले तर ११ आणि १२ आॅक्टोंबर रोजी दुसरे प्रशिक्षण आयटीआय वागळे इस्टेट येथे होणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019