शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

ड्रग माफियांवर कडक कारवाई करणार- विवेक फणसळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 9:11 PM

ड्रग माफियांवर कारवाई करण्याबरोबरच युवकांमध्येही पोलिसांकडून व्यापक प्रमाणावर जनजागृती केली जाणार आहे. व्यसनापासून दूर राहण्यासाठी त्यांचे समुपदेशन केले जाणार असून महाविद्यालयांमध्ये एक कॉलेज एक पोलीस शिपाई ही योजनाही राबविली जाणार असल्याचे ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सांगितले.

ठळक मुद्देस्टॉप ड्रग्ज मोहीमेतील स्पर्धकांचा विशेष सत्कारएक पोलीस एक कॉलेज योजनाही राबविणारव्यसनांपासून दूर राहण्याचा विद्यार्थ्यांना दिला सल्ला

ठाणे: युवकांना व्यसनी बनविण्यासाठी महाविद्यालय परिसरातच बऱ्याचदा ड्रग माफीया आपले जाळे पसरवितात. हे वारंवार उघड झाले. त्यामुळे अशा ड्रग माफियांवर कारवाई करण्याबरोबरच युवकांमध्येही पोलिसांकडून व्यापक प्रमाणावर जनजागृती केली जाणार आहे. कोणत्याही व्यसनापासून दूर रहावे, असा संदेश युवकांनीच संपूर्ण समाजापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी शुक्रवारी केले.गेल्या एक आठवडाभरापासून ठाणे आणि भिवंडीतील दहा महाविद्यालयांमध्ये ‘स्टॉप ड्रग्ज’ हे अमली पदार्थ विरोधी अभियान ठाणे पोलिसांच्या वतीने राबविले गेले. यानिमित्त विविध स्पर्धाही या महाविद्यालयांमध्ये घेण्यात आल्या. या स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ ठाण्याच्या ‘टीप टॉप प्लाझा’ येथील सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या नृत्य किंवा इतर स्पर्धांमधील काही स्टेप्स तुमच्या जशा लक्षात राहतील. त्याप्रमाणेच यातून या विद्यार्थ्यांनी दिलेला संदेश लक्षात राहणे गरजेचे आहे. एखादी व्यक्ती कोणत्याही व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर जे दुष्परिणाम होतात. यात केवळ त्याचे कुटूंबच नाहीतर समाजही भरडला जातो. नशेचे ‘उडान’ केल्यास त्याचे लॅन्डींग मात्र बरबादीकडेच आहे. त्यापेक्षा शिक्षण, नोकरी व्यवसायात यश मिळवून यशाचे उडाण करा, असा कानमंत्रही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. केवळ एखाद्या सप्ताहापुरते हे अभियान नसावे ते युवकांनी यापुढेही चालू ठेवल्यास एक चांगली निव्यर्सनी पिढी तयार होईल. आंतरराष्टÑीय स्तरावरही या पिढीची यशस्वी कामगिरी होईल. महाविद्यालयांनी अमली पदार्थ विरोधी अभियानात सहभागी झाल्याबद्दल त्यांचे कौतुक करुन यापुढे प्रत्येक महाविद्यालयाची एका पोलीस शिपायावर जबाबदारी सोपविली जाईल. अमली पदार्थविरोधी मोहीमेवर या शिपायाकडून करडी नजर राहील. त्यातून विद्यार्थ्यांना भेडसावणा-या अडचणी या पोलिसामार्फत सोडविण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही यावेळी फणसळकर यांनी दिली.यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, प्रविण पवार, केशव पाटील, पोलीस उपायुक्त डॉ.डी. एस. स्वामी, अविनाश अंबुरे, अमित काळे, सहायक पोलीस आयुक्त मुकूंद हातोटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे आणि उपनिरीक्षक कल्याणी पाटील यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते...............................या अमली पदार्थ विरोधी अभियानात ठाण्यातील १० महाविद्यालयांमधील १३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविल्याचे पोलीस उपायुक्त दिपक देवराज यांनी सांगितले....................यावेळी रांगोळी स्पर्धेत भाविशा म्हात्रे (बीएनएन, कॉलेज, भिवंडी), घोषवाक्य - जुही पाटील (वसंत विहार, ज्यु. कॉलेज, ठाणे), पोस्टर पेंटींग- आर्यन गारिवाले, सेंट झेव्हीयर्स ज्यु. कॉलेज, मानपाडा, ठाणे, वक्तृत्व स्पर्धेत निशा यादव, स्वयंसिद्धी कॉलेज, ठाणे आणि समुह नृत्य स्पर्धेत गार्गी आणि गृ्रप, वसंत विहार कॉलेज ठाणे यांनी पाहरतोषिक पटकवली. सर्व विजेत्या विद्यार्थी आणि शिक्षकांना पोलीस आयुक्त फणसळकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले..............................

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस