धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मीरा-भाईंदर महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला आरक्षित झाल्याने अनेकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या पदासाठी सलग ५ वेळा निवडून आलेल्या अनिता पाटील यांच्यासह अनेक जुन्या व नव्या महिलांच्या नावांची चर्चा आहे. मात्र, शहरातील राजकीय समीकरणे, आरक्षण नसल्याने भाजप यंदा अमराठी महापौर देण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इथे यंदा ५१ महिला निवडून आल्या. त्यात ४२ नगरसेविका भाजपतून, ६ काँग्रेसमधून, तर ३ शिंदेसेनेच्या आहेत. भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने महापौर भाजपचा होणार यात शंका नाही. मोठ्या यशानंतर भाजपतून माजी उपमहापौर हसमुख गेहलोत, माजी जिल्हाध्यक्ष ॲड. रवी व्यास, ध्रुवकिशोर पाटील, प्रशांत दळवी, मदन सिंग, दिनेश जैन, सुरेश खंडेलवाल, अनिल विराणी, मुन्ना सिंहपासून अनेकांची नावे महापौरपदासाठी चर्चेत होती. मात्र, आरक्षणामुळे त्यांची संधी गेली.
भाजपच्या माजी जिल्हा महिलाध्यक्ष अनिता पाटील या सर्वांत ज्येष्ठ नगरसेविका आहेत. त्यामुळे त्यांचा विचार होण्याची शक्यता जास्त आहे. याशिवाय वंदना पाटील, नयना म्हात्रे, शानू गोहिल, स्नेहा पांडेय, दीप्ती भट, सुनीता जैन, वर्षा भानुशाली, नीला सोन्स, सीमा शाह, वंदना भावसार आदी अनेक नगरसेविकांची नावे शर्यतीत आहेत.
यांना पुन्हा संधी मिळणार का?
२०१७ साली भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी त्यांची भावजय डिंपल मेहता यांना महापौरपदाची संधी दिली होती. सन २०१९मध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणातून ज्येष्ठ नगरसेविका ज्योत्स्ना हसनाळे यांची महापौरपदी वर्णी लागली होती. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी देणार की, नवीन चेहऱ्यापैकी कोणाला संधी दिली जाणार की, ज्येष्ठांचा विचार होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Mira-Bhayandar may see a non-Marathi mayor due to new reservations. Senior corporator Anita Patil and others are contenders. BJP's majority makes their candidate likely, with speculation on whether a fresh face or veteran will be chosen.
Web Summary : मीरा-भायंदर में नए आरक्षणों के कारण गैर-मराठी महापौर देखने को मिल सकता है। वरिष्ठ पार्षद अनिता पाटिल और अन्य दावेदार हैं। भाजपा के बहुमत से उनका उम्मीदवार संभावित है, इस अटकल के साथ कि कोई नया चेहरा या अनुभवी चुना जाएगा।