शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

एनआरसी सर्व्हेत मुंब्य्रातील ९० टक्के नागरिक अपात्र ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 07:05 IST

जनजागृती कार्यक्रमातून आवश्यक कागदपत्रे नसल्याचे उघड

मुंब्रा : नॅशनल रजिस्ट्रार ऑफ सिटीझन (एनआरसी) सर्व्हेबाबत नागरिकांच्या मनात असलेली भीती दूर व्हावी, भविष्यात देशात होणाऱ्या सर्व्हेला नागरिकांनी निर्भीडपणे सामोरे जावे, यासाठी जनजागृती करण्याकरिता सलाम मुंब्रा फाउंडेशन आणि हासरा एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने रविवारी मुंब्य्रात आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमाला उपस्थित ९० टक्के लोकांकडे सर्व्हेसाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.आसाममध्ये करण्यात आलेल्या एनआरसीमुळे तेथील तब्बल १६ लाख नागरिकांचे नागरिकत्व त्यांच्याकडे असलेल्या अपुºया कागदपत्रांमुळे धोक्यात आले आहे. याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित होणाºया बातम्या तसेच समाजमाध्यमावर व्हायरल होत असलेल्या मेसेजमुळे या सर्व्हेबद्दल नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यांच्या मनातील भीती दूर व्हावी, याकरिता हा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्र मात उपस्थित असलेल्यांपैकी ९० टक्के लोकांकडे एनआरसी सर्व्हेत पात्र ठरण्याकरिता आवश्यक कागदपत्रे नसल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली. यामुळे नागरिकांकडे सध्या असलेली कागदपत्रे एनआरसीसाठी पुरेशी आहेत की नाहीत, याची पडताळणी करण्यासाठी २ आॅक्टोबरला मुंब्य्रातील कौसा परिसरातील सेंट मेरी हायस्कूलमध्ये शिबिर आयोजित करण्यात आले आहे. एनआरसी सर्व्हेपूर्वी पुढील वर्षी १ एप्रिल ते ३० सप्टेंबरपर्यंत राष्ट्रीय जनगणना होणार आहे. यात घरोघरी जाऊन होणाºया नोंदीमध्ये नागरिकांनी त्यांची माहिती द्यावी, असे आवाहन प्रमुख वक्ते डॉ. अल्तमाज फैजी तसेच आयोजक प्रा. हसन मुल्लाणी यांनी केले.

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीmumbraमुंब्रा