ठाण्यात रानटी सरड्याला मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:05 IST2021-05-05T05:05:40+5:302021-05-05T05:05:40+5:30
ठाणे : जांभळीनाका येथील चिंतामणी ज्वेलर्स चौकाजवळील रस्त्याच्या कडेला एक रानटी सरडा गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. ठाणे महानगरपालिकेच्या ...

ठाण्यात रानटी सरड्याला मिळाले जीवदान
ठाणे : जांभळीनाका येथील चिंतामणी ज्वेलर्स चौकाजवळील रस्त्याच्या कडेला एक रानटी सरडा गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास धाव घेऊन या सरड्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
सुमारे एक फूट लांबीचा हा सरडा मासुंदा तलावासमोरील रस्त्यावर जखमी अवस्थेमध्ये पडला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कक्षाला मिळाली होती. त्या आधारे या कक्षाच्या पथकाने तातडीने त्याच्या बचावासाठी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा त्याच्या डाव्या पायाला मार लागल्याचे आढळले. त्याला कोकणीपाडा येथील वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनच्या अॅनिमल ट्रान्सिट सेंटर या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर आता उपचार सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख संतोष कदम यांनी दिली.
....................................