गुढीपाडव्याच्या दिवशीच संशयावरून पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 06:21 IST2019-04-08T06:20:46+5:302019-04-08T06:21:01+5:30

उल्हासनगरातील घटना : पतीला अटक, मुलीसमोरच गळा दाबून घेतला जीव

Wife murdered on suspicion of Gudi Padva | गुढीपाडव्याच्या दिवशीच संशयावरून पत्नीची हत्या

गुढीपाडव्याच्या दिवशीच संशयावरून पत्नीची हत्या

उल्हासनगर : अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना उल्हासनगरात शनिवारी, ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी घडली. हे हत्याकांड १३ वर्षांच्या मुलीसमोर घडले असून, तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम बापाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.


उल्हासनगर, कॅम्प नं.-१ मध्ये मुकुंदनगर येथे प्लंबरचे काम करणारा दीपक पगारे हा पत्नी आणि मुलीसोबत वास्तव्याला आहे. घरी आर्थिक ओढाताण होऊ नये, म्हणून रेखा धुण्याभांड्याचे काम करत होती. त्यांना प्रतीक्षा नावाची १३ वर्षांची मुलगीही आहे.
काही दिवसांपासून पत्नीच्या अनैतिक संबंधांविषयी दीपकला संशय होता. त्यामुळे त्यांच्यात भांडणेही व्हायची. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता रेखा घरी आल्यानंतर पुन्हा दोघांत भांडणे झाली.


यावेळी दीपकने रागाच्या भरात पत्नीचा गळा आवळून खून केला. हा सर्व प्रकार घरात असलेल्या प्रतीक्षासमोर झाला. या
घटनेनंतर दीपकने घरातून पळ काढला.


ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी घडलेल्या या खुनाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. मुलीच्या तक्र ारीवरून दीपकविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून, त्याला रात्रीच अटक केली.

Web Title: Wife murdered on suspicion of Gudi Padva

टॅग्स :Murderखून