पत्नीने मारहाण करत केली चोरी

By Admin | Updated: July 9, 2017 01:54 IST2017-07-09T01:54:57+5:302017-07-09T01:54:57+5:30

पत्नीने मारहाण करून सोन्याचे दागिने चोरी केल्याची तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात पतीने केली आहे. हा गुन्हा न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झाला आहे.

The wife beat up the theft | पत्नीने मारहाण करत केली चोरी

पत्नीने मारहाण करत केली चोरी

- लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : पत्नीने मारहाण करून सोन्याचे दागिने चोरी केल्याची तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात पतीने केली आहे. हा गुन्हा न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झाला आहे. तत्पूर्वी त्या पतीविरोधात पत्नीने हुंड्यासाठी मारहाण केल्याची तक्रार दाखल असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.
फिर्यादींने पत्नीचा मोबाईल त्यांच्याकडे ठेवला असता, तो त्यांच्या खिशातून काढून खाली फेकून देऊन तिने त्यांना मारहाण केली.
तसेच ८७ हजारांचे सोन्याचे दागिन्यांची घरातून चोरी करून जम्मू- काश्मीरला आई-वडिलांच्या घरी पळून गेली. दरम्यान, परत येऊन बंद घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरात बेकायदा प्रवेश केला होता.
हा प्रकार २५ मे २०१७ ते १२ जून २०१७ दरम्यान, पातलीपाडा घोडबंदर रोड येथे घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच याप्रकरणी अटक केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

घोडबंदर रोड, पातलीपाडा येथे राहणारे ३५ वर्षीय फिर्यादींने दिलेल्या तक्रारीत, त्यांच्या पत्नीने तिच्या मित्रास घरी बोलून शरीरसंबध ठेवल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांचे व्हीडिओ रेकॉर्डिंग त्यांना दाखवून पोलिसात तक्रार करू नको व कोणाला सांगू नको अशी धमकी दिल्याचे म्हटले.

Web Title: The wife beat up the theft