क्षुल्लक कारणावरून पत्नीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 03:00 IST2018-11-12T02:59:53+5:302018-11-12T03:00:43+5:30

नौपाडा भागात राहणाºया प्रमिला शर्मा (नावात बदल) या महिलेला भाऊबीजेनिमित्त माहेरी जाण्यासाठी तिने पतीकडे हट्ट धरला होता. पण,

Wife to be beaten for minor reasons | क्षुल्लक कारणावरून पत्नीला मारहाण

क्षुल्लक कारणावरून पत्नीला मारहाण

ठाणे : भाऊबीजेला माहेरी पाठवले नाही, मुलगी खेळताना पडली, अशा क्षुल्लक कारणांवरून पत्नीला मारहाण करणाऱ्या तिघांना नौपाडा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत अटक केली. विशेष म्हणजे, तिन्ही घटनांत पतीला एकवेळ सुधारण्याची संधी द्यावी, अशी मागणीही या महिलांनी पोलिसांकडे केली.

नौपाडा भागात राहणाºया प्रमिला शर्मा (नावात बदल) या महिलेला भाऊबीजेनिमित्त माहेरी जाण्यासाठी तिने पतीकडे हट्ट धरला होता. पण, आर्थिक कारणास्तव त्याने तिला जाण्यास नकार दिला. यातूनच त्यांच्यात खडाजंगी झाली. या वादातूनच त्याने तिच्या श्रीमुखात लगावली. संतापलेल्या प्रमिलाने पतीविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात ९ नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच त्याने तिला माहेरी पाठवण्याची तयारी दाखवली. अखेर, त्याच्यावर नौपाडा पोलिसांनी १५१ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई केली. दुसºया घटनेत भावना सोनवणे (नावात बदल) ही महिला शुक्रवारी स्वयंपाक करत असताना तिची मुलगी पलंगावरुन खाली पडली. मुलीला सांभाळता येत नाही का, असा जाब विचारत तिच्या पतीने तिला मारहाण केली.

Web Title: Wife to be beaten for minor reasons