शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षांची भाडेवाढ कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 1:09 AM

वेळोवेळी लादलेल्या अघोषित वाढीचे काय? : एकीकडे लूट आणि दुसरीकडे उद्धटपणा; बेशिस्त वर्तणुकीला प्रवासी वैतागले

- जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : संपूर्ण ठाणे शहरात २५ हजार, तर जिल्हाभर सव्वालाखांच्या घरात अधिकृत रिक्षांची संख्या आहे. सध्या १८ रुपये प्रती दीड किलोमीटर असलेल्या प्रवासी मीटर भाड्यात तीन रुपयांची भर पडणार आहे. त्यामुळे ते २१ रुपयांवर जाणार आहे. आधीच पेट्रोलसह इतर वस्तूंच्या किमती वाढल्या असताना, या भाडेवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. मुळात बहुतांश रिक्षा सीएनजीवर चालत असताना, पेट्रोल दरवाढीमुळे रिक्षांची भाडेवाढ करण्याचे कारणच काय, असा सवाल प्रवाशांनी केला आहे.

कोरोना काळात रिक्षा चालकांनी नियमांचे पालन केले. मात्र, अनलॉकनंतर नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. दोनऐवजी चार ते पाच प्रवाशांची वाहतूक केली जाते. मास्क आणि सॅनिटायझरही अनेक रिक्षांमधून गायब झाले आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे रिक्षांनाही भाडेवाढ लागू केली आहे. खरे तर शहरी भागात सीएनजीवरील रिक्षांचे प्रमाण जास्त असताना, ही भाडेवाढ होणे योग्य नसल्याचे मत अनेक प्रवाशांनी व्यक्त केले आहे. ही भाडेवाढ करण्याआधीच लोकमान्यनगर ते ठाणे रेल्वे स्थानक शेअररिंगच्या रिक्षामध्ये १८ रुपये भाडे लॉकडाऊनच्या आधी लागत होते. ते नंतर प्रति प्रवासी थेट ३० रुपये केले. ठाणे ते कळवादरम्यानचे भाडे १२ वरून १५ रुपये झाले. माजीवडा येथील प्रवासासाठीही २० वरून ३० रुपये केले आहेत. ठाणे स्थानक ते मानपाडा ३० वरून ४० रुपये केले आहेत. ठाणे स्थानकातून मीरा रोड किंवा भिवंडीला जाण्यासाठी मीटरने ४०० ते ४५० रुपये होतात. त्याऐवजी ६०० ते ७०० रुपयांचे बोली भाडे घेतले जाते. नवखा प्रवासी असेल, तर याहीपेक्षा जास्त भाडे उकळले जाते. तीनहात नाका येथूनही घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात भाडे आकारले जाते. जांभळी नाका येथून रेल्वे स्थानक भागातून नौपाडा किंवा तीनहात नाका भागाकडे जाण्यासाठी भाडे नाकारले जाते. नौपाड्यातून रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठीही रिक्षा मिळत नाही. 

२०१५ नंतर रिक्षाची भाडेवाढ झालेली नव्हती. खटुआ समितीने सुचविलेली भाडेवाढ शासनाने मान्य केली आहे. ती सुरुवातीच्या दीड किलोमीटरसाठी १८ वरून २१ रुपये होणार आहे. - जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे

सहा वर्षांपासून रिक्षाची भाडेवाढ नव्हती. सर्व स्पेअर पार्टच्या आणि सीएनजीच्या दरातही गेल्या सहा वर्षांत वाढ झाली. कोरोना काळातही रिक्षा चालकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्यामुळे ही भाडेवाढ योग्यच आहे.- सुनिल वाघमारे, रिक्षा चालक, ठाणे

सहा वर्षांपासून रिक्षाची भाडेवाढ नव्हती. सर्व स्पेअर पार्टच्या आणि सीएनजीच्या दरातही गेल्या सहा वर्षांत वाढ झाली. कोरोना काळातही रिक्षा चालकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्यामुळे ही भाडेवाढ योग्यच आहे.- सुनिल वाघमारे, रिक्षा चालक, ठाणे

शासनाने केलेली ही भाडेवाढ आहे. सर्वसामान्य रिक्षा चालकांना यातून दिलासा मिळेल.- बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर

भाडेवाढीचा निर्णय उत्तम आहे. कोरोनाचे जे संकट आहे, त्यावर काही तरी दिलासा मिळेल.- रवींद्र पाफाळे,रिक्षा चालक, मानपाडा, ठाणे

टॅग्स :Petrolपेट्रोल