शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये दोन मुलींना रेल्वे स्थानकात बेवारस सोडून जाणारा 'तो' निर्दयी बाप कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 14:39 IST

कल्याण रेल्वे स्थानक हे जंक्शन. त्याठिकाणी लाखो प्रवासी ये जा करतात. नेहमीच वर्दळीचे ठिकाण. रविवारी रात्रीसाडे आठ वाजताची वेळ. दोन चिमुकल्या मुलींना एक अज्ञात इसम रेल्वे स्थानकात सोडून जातो.

कल्याण- कल्याण रेल्वे स्थानक हे जंक्शन. त्याठिकाणी लाखो प्रवासी ये जा करतात. नेहमीच वर्दळीचे ठिकाण. रविवारी रात्रीसाडे आठ वाजताची वेळ. दोन चिमुकल्या मुलींना एक अज्ञात इसम रेल्वे स्थानकात सोडून जातो. त्यापैकी एकी मुलीचे वय अवघे दोन वर्षे तर दुसरीचे तीन वर्षे. सुदैवाने या दोन्ही मुली रेल्वे पोलिसांच्या हाती लागतात. तेव्हा रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फूटेज तपासले जाते.फूटेजमधील इसमाचा फोटा पाहून मुली पापा पापा असे बोलतात. तेव्हा पोलीस गोंधळून जातात. त्या मुलींना सोडणारा अज्ञात इसम आहे की त्या मुलींचा बापच त्यांना सोडून गेला आहे. हा प्रकार पाहून पोलिससुद्धा अवाक् होतात. त्यांच्याकडून तपास सुरु करण्यात आला आहे. मुली पोलिसांच्या ताब्यात सुखरुप आहेत. पोलीस त्या मुलींची काळजी घेत आहे. काय असे घडले असेल त्या इसमाने त्या लहानग्या मुलींनी रेल्वे स्थानकात सोडून जाण्याची वेळ त्याच्यावर आली असावी. मुलगी हवी. मुलगी वाचवा, बेटी बचाव अशा नारा सगळीकडे दिला जातो. आजही मुलींचा दुस्वास आणि तिरस्कार समाजात पाहायावस मिळतो.कदाचित हे एक कारण त्या मुलींना रेल्वे स्थानकातील फटालावर सोडून जाण्यात असू शकते. मुली रात्री दीड वाजता पोलिसांनी फलाटावर एकट्या मिळून आल्या. रेल्वे स्थानकातील येणा-या गाडय़ांमुळे मुलीचा अपघात झाला असता. कोणी त्याना उचलून घेऊन गेले असते. त्यांना भिकेच्या धंद्याला लावले असते किंवा विकून दिले असते अशा एक ना अनेक शक्यता त्या मुलींच्या जिविताशी घडल्या असता. मात्र पोलिसांच्या कस्टडीत त्या असल्याने त्या सुरक्षित आहे. पोलीस मुलींना सोडून जाणा-या इसमाचा शोध घेत आहे. त्याचा पत्ता लागल्यावरच या मुलींना त्याने का सोडले. त्यामागचे कारण काय. तो खरच त्या मुलींचा बाप आहे की नाही हे उघड होणार आहे. काही असले तरी माणुसकीला काळिमा फासणारी घटना ऐकून सगळ्यांचेच मन हेलावून टाकणारी आहे. 

टॅग्स :kalyanकल्याण