शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

गुंजाळ हत्येतील सूत्रधार कोण?

By admin | Updated: December 29, 2015 00:58 IST

शिवसेनेचे नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्या हत्याप्र्रकरणातील चारही आरोपी पोलीस कोठडीत असले तरी या हत्येमागील सूत्रधार कोण, हे शोधण्याचे आव्हान टिटवाळा पोलिसांना पेलावे लागणार आहे.

- पंकज पाटील,  अंबरनाथशिवसेनेचे नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्या हत्याप्र्रकरणातील चारही आरोपी पोलीस कोठडीत असले तरी या हत्येमागील सूत्रधार कोण, हे शोधण्याचे आव्हान टिटवाळा पोलिसांना पेलावे लागणार आहे. अटकेतील चार आरोपींपैकी संदीप गायकर याच्या दोन काकांना गुंजाळ यांनी मारले होते, याचा राग मनात असल्याने आणि काही दिवसांत आम्हालाही गुंजाळ मारणार होते. त्यामुळेच आम्हीच त्यांचा काटा काढला, असा जबाब आरोपींनी टिटवाळा पोलिसांना दिला आहे. मात्र, गुंजाळ यांच्या पत्नीसह त्यांच्या सर्व नातेवाइकांनी सोमवारी पोलीस ठाण्यात जाऊन मारेकऱ्यांसोबत सूत्रधारांनाही अटक करण्याची मागणी केली. त्यामुळे या हत्येमागे आणखी कोणी सूत्रधार असल्याचा संशय नातलगांना वाटतो. या आरोपींव्यतिरिक्त संशयाच्या पिंजऱ्यात असलेल्या अन्य व्यक्तींकडून नेमकी कोणती माहिती मिळते, यावरच पुढील तपास आणि हत्येमागचे धागेदोरे अवलंबून आहेत, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. आम्ही नाशिकला वकिलांना भेटायला गेलो होतो, येताना ढाब्यावर जेवायला थांबलो, अशी माहिती चौघांनीही टिटवाळा पोलिसांना दिल्याचे सांगितले जाते. मात्र, कोणत्या वकिलांना ते भेटले किंवा नेमकी त्यांची जेवणाची आणि पोलिसांच्या गस्तीची वेळ कशी जुळून आली, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यामुळे आरोपींना खरेच अटक झाली की, ते शरण आले आणि नंतर त्यांना शिताफीने अटक केल्याचे दाखविले, याचा उलगडा दिवसभरात झाला नाही आणि पोलिसांनीही केला नाही. अटक करणाऱ्या पोलिसांच्या पथकात पूर्वी अंबरनाथमध्ये काम केलेल्या पोलिसांमुळे आरोपींना ओळखणे सोपे गेले, असे स्पष्टीकरण नंतर पोलिसांनी दिले. मात्र, आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याने या काळात हत्येमागील सूत्रधार शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांना पेलावे लागणार आहे. चेहरे दाखवण्याची घाई का?एखाद्या गुन्ह्यातील आरोपींचे चेहरे न दाखविता त्यांना न्यायालयात हजर केले जाते. आरोपींची ओळख उघड करण्याबाबत न्यायालयाचेही काही निर्बंध आहेत. तसे आदेश पोलिसांनी यापूर्वीच काढले आहेत. पण, गुंजाळ हत्येतील चारही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्यावर लगेचच सोशल मीडियावर त्यांचे फोटो झळकले. त्यामुळे अटक केल्याचे श्रेय घेण्याच्या नादात पोलिसांनी अतिउत्साहात हा प्रकार केल्याची चर्चा नंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांत रंगली होती. मात्र, त्या आरोपींचे हसरे चेहरे व्हायरल झाल्याने गुंजाळ समर्थकांनी संताप व्यक्त केला. आरोपी अलगद हाती पडल्याचे कोडेगुंजाळ यांचे मारेकरी हे टिटवाळा पोलिसांपुढे शरण आल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले. मात्र, दुसऱ्या दिवशी पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने या आरोपींना खडवलीच्या एका ढाब्यावरून जेवताना ताब्यात घेतल्याची नोंद केली. असे असले तरी लोकमतचे वृत्त खोडून काढण्याचा कोणताही प्रयत्न पोलिसांनी केला नाही. त्यामुळे आरोपी हजर झाले की, त्यांना ढाब्यावरून अलगद अटक केली, हे कोडे उलगडले नाही.