शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

गोवरचा सव्र्हे करतांना, अनंत अडचणींचा सामना

By अजित मांडके | Updated: November 28, 2022 16:27 IST

गोवरला रोखण्यासाठी ठाणे  महापालिकेने पावले उचलली असली तरी देखील मुंब्रा व इतर भागात सव्र्हेक्षण करण्यासाठी जाणा:या पथकांना वाईट अनुभव येत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

ठाणे :

गोवरला रोखण्यासाठी ठाणे  महापालिकेने पावले उचलली असली तरी देखील मुंब्रा व इतर भागात सव्र्हेक्षण करण्यासाठी जाणा:या पथकांना वाईट अनुभव येत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तोंडावर दरवाजा आपटणो, सव्र्हेला विरोध करीत थेट पथकाच्या अंगावर अख्खी सोसायटी धावून जाणो, घरात असतांनाही बाहेरुन कुलुप लावून घरात नसल्याचे भासविणो, आता नको नंतर या असे अक्षरश: पिटाळून लावण्याचे प्रकार सुरु असल्याने गोवरचा अटकाव करायचा कसा असा पेच त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.

ठाण्यात मागील काही दिवसापासून गोवरच्या संख्या वाढत आहे. त्यामुळे गोवरला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून लसीकरण मोहीम आणि सव्र्हे सुरु करण्यात आला आहे. यामध्ये मुंब्रा, कौसा, आतकोनेश्वरनगर, शीळ आणि वर्तकनगर या आरोग्य केंद्रावर भर दिला जात आहे. ठाणे  महापालिका हद्दीत आजच्या घडीला २७४ जणांचे सम्पल घेण्यात आले होते. त्यातील ५४ जणांना गोवरची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यातील ३६ रुग्ण पार्कीग प्लाझा आणि १४ रुग्णांवर कळवा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये ० ते ५ या वयोगटातील ७० टक्के, ६ ते १५ वयोगट - २९ टक्के आणि १५ ते १८ वयोगटातील १ टक्के रुग्णांचा समावेश आहे. यातील बहुतेकांनी गोवरची लस घेतली नसल्याचेच तपासणीत आढळून आले आहे.गोवरला रोखण्यासाठी महापालिकेने मुंब्रा व इतर भागात सव्र्हे सुरु केला आहे. मात्र मुंब्य्रात सव्र्हे करण्यासाठी जाणा:या महापालिकेच्या पथकाला अतिशय वाईट अनुभव येत असल्याचे दिसून आले आहे.

अमृत नगर भागात सव्र्हेसाठी गेलेल्या पथकाला इमारतीमधील सर्व रहिवासी मारहाण करण्यासाठी धावून आल्याचे गंभीर बाब पुढे आली आहे. एका ठिकाणी तोंडावर दरवाजा बंद करण्यात आला. त्यात पथकातील एका कर्मचा:याची बोटे दरवाज्यात अडकल्याचेही दिसून आले. त्यातही घरात असतांना बाहेरुन कुलुप लावून घेऊन घरातच लपून बसण्याचे प्रमाणही या भागात अधिक असल्याचे सव्र्हेत दिसून आले आहे. लसीकरण आज नको उद्या या असे सांगून दुसऱ्या दिवशी घराला टाळे लावून बाहेर निघून जाणो असे काही प्रकार घडले आहेत. त्यामुळे सव्र्हे आणि लसीकरण करायचे कसे असा पेच महापालिकेच्या पथकांना सतावू लागला आहे.

शाळा व्यवस्थापनाने देखील यात लक्ष घालण्याचे गरजेचे आहे. त्यानुसार शाळेतील शिक्षकांनी एखाद्या मुलाला ताप आला असेल तर त्याला लागलीच घरी पाठविणो गरजेचे असल्याचे पालिकेने सांगितले. तसेच लसीकरणाबाबत चित्रफीतीच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.

गोवरचे लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. तसेच सव्र्हेवर देखील भर दिला जात आहे. सव्र्हेसाठी १६० पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांच्या माध्यमातून पहिल्या टप्यातील सव्र्हे झाला आहे. दुसऱ्या टप्यातील सव्र्हे सुरु आहे. तो पूर्ण झाल्यावर पुन्हा सव्र्हेचे काम तिस:या टप्यात सुरु होणार आहे. जेणोकरुन गोवरची साखळी आताच रोखणो त्यामुळे शक्य होणार आहे. (अभिजित बांगर - आयुक्त, ठामपा)