उमेदवार कोण, यापेक्षा नरेंद्र मोदींना निवडून आणायचे - शंभूराज देसाई

By अजित मांडके | Updated: April 3, 2024 21:42 IST2024-04-03T21:41:18+5:302024-04-03T21:42:32+5:30

ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली

Which candidate should elect Narendra Modi - Shambhuraj Desai | उमेदवार कोण, यापेक्षा नरेंद्र मोदींना निवडून आणायचे - शंभूराज देसाई

उमेदवार कोण, यापेक्षा नरेंद्र मोदींना निवडून आणायचे - शंभूराज देसाई

ठाणे: ठाणे लोकसभेचा उमेदवार ⁠कोण असेल यापेक्षा मोदींना ४०० पार जागा निवडून द्यायच्या आहेत यावर आमचे लक्ष असल्याचे मत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.

ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली होती, यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ⁠महायुतीचा पहिलाच मेळावा होतोये तो ही ठाण्यात. त्यामुळे हा मेळावा खुप महत्वाचा आहे, ⁠ठाणे लोकसभेची कोणाला उमेदवारी दिली गेली याबाबत मला काही माहिती नाही, मात्र सन्मान जनक उमेदवार ठाण्यात दिला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

⁠ठाण्याचा पालकमंत्री असलो तरी उमेदवार ठरवण्याचे काम महायुतीतील वरीष्ठांचे असल्याचेही ते म्हणाले. जागा बदला बाबत चर्चे बाबत त्यांना छेडले असता जागा बदलाबाबत मला तरी काही माहिती नसल्याचे ते म्हणाले. महायुतीला या निवडणूकीत ४५ पेक्षा जास्त जागा मिळतील असेही ते म्हणाले.

Web Title: Which candidate should elect Narendra Modi - Shambhuraj Desai