शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

सहल असो की शाळेत येणे-जाणे, विद्यार्थ्यांची जबाबदारी शाळेवरच, बालहक्क संरक्षण आयोगाने ठणकावले

By जितेंद्र कालेकर | Updated: February 26, 2024 19:40 IST

‘त्या’ शाळेतील गैरप्रकारप्रकरणी कडक कारवाई: पालकांशीही साधला संवाद

ठाणे : शाळेच्या सहलीला, अभ्यास दौऱ्यासाठी किंवा अगदी दरराेज शाळेत ये-जा करताना गणवेशातील सर्व विद्यार्थ्यांची जबाबदारी शाळा प्रशासनाचीच आहे. त्यासाठी इतर कोणालाही ठेका दिला असला तरी अशा जबाबदारीपासून शाळा पळ काढू शकत नसल्याचे राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा अॅड. सुशीबेन शहा यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात शाळेने लेखी निवेदन देऊन ते प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्याची सूचनाही त्यांनी केली.

ठाण्यातील सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूलच्या सहलीदरम्यान दुसरीच्या विद्यार्थ्यांशी झालेल्या गैरप्रकारानंतर सोमवारी या शाळेला त्यांनी भेट देऊन बैठक घेतली. बैठकीसाठी शाळेचे विश्वस्त संदीप गोयंका यांच्यासह सहायक पोलिस आयुक्त मंदार जावळे, बालकल्याण समितीच्या ठाणे अध्यक्षा राणी बैसने, महिला व बालविकास विभागाचे ठाण्याचे अध्यक्ष महेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. तसेच पीडित विद्यार्थ्यांच्या पालकांची भेट घेत सुशीबेन यांनी त्यांना दिलासा दिला.

बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना अॅड. शहा यांनी शाळा प्रशासनाच्या पवित्र्यावर कोरडे ओढले. सहलीआधी शाळेने पालकांकडून ‘परवाना पत्र’ लिहून घेते. सहलीसाठी त्रयस्थ कंपन्यांची मदत घेतली तरी शाळा अशी जबाबदारी टाळू शकत नाही. यामध्येही शाळेने जबाबदारी स्वीकारून घटनेची सर्व माहिती, शाळेने केलेली कारवाई आदी गोष्टींबाबत एक जाहीर निवेदन प्रसृत करण्याची गरज असल्याची सूचनाही त्यांनी केली.

‘बाल स्नेही महाराष्ट्रा’साठी उपक्रमबाल हक्कांबाबत दाद कुठे मागायची याची अनेकांना माहिती नसते. त्यामुळेच त्याची माहिती देण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या सहकार्याने राज्यभर बाल सुरक्षा अभियान राबविले जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण िदले जाणार आहे. शहरात मध्यवर्ती ठिकाणी बालहक्क उद्याने उभारून बालकांचे हक्क काय आहेत, ते हक्क पूर्ण न झाल्यास किंवा अशा घटना घडल्यास कोणाकडे दाद मागायची, याची माहिती दिली जाणार आहे. या उपक्रमांमद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात लहान मुलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

...तर पालकांनी तक्रार करावीयाच शाळेत लैंगिक शोषणाची आणखी एक घटना घडल्याचे पालकांनी अॅड. शहांच्या निदर्शनास आणले. संबंधित पालकांनी तक्रार दाखल केली नसल्याचेही त्यांनी सांगितले. अशी ष्घटना कोणत्याही शाळेत ष्घडल्यास पालकांनी तक्रार करावी. बाल हक्क संरक्षण आयोग त्यासाठी सवेर्तोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

गोयंका इंटरनॅशनल स्कुलमधील ष्घटनेमुळे वाहतूक विभाग, बालकल्याण समिती, महिला व बालविकास विभाग यांच्याशी चर्चा करून शाळांच्या बसगाड्यांसाठी लवकरच मार्गदर्शक सूचना निश्चित केल्या जाणार आहेत. शाळेने भाडेतत्त्वावर बस घेतल्या तरी त्यात काही ठरावीक गोष्टींची पूर्तता होणे आवश्यक आहे. या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी महत्त्वाची ठरणार आहे.- अॅड सुशिलाबेन शहा, अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग. 

टॅग्स :Schoolशाळाthaneठाणे