शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
2
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
3
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
4
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
5
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
6
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
7
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
8
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
9
भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
10
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
11
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
12
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
13
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
14
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
15
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
16
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
17
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
18
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
19
Beauty Jha : संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
20
२७ जागांवर वंचित कुणाचा करणार 'गेम', महापालिका निवडणुकीत ५३ उमेदवार उतरवले रिंगणात
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या राजकारणात आमचे मुद्दे  गेले कुठे..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:02 IST

...म्हणूनच हा स्तंभ तुमच्यासाठी. नेत्यांच्या राजकारणात सर्वसामान्य नागरिकांचे मुद्दे गेले कुठे? असा सवाल या स्तंभामधून निवडणुका होईपर्यंत विचारला जाईल.

पालिका निवडणुकीत रस्ते, पाणी, वीज, नाट्यगृह, वाचनालय, स्वच्छ चांगले फुटपाथ, चांगले उद्यान, स्थानिक पातळीवरची चांगली आरोग्य सुविधा या विषयांची चर्चा व्हावी असे नागरिकांना वाटते. लोकांचे हे प्रश्न कसे सोडवले जाणार? याची उत्तरे नागरिकांना हवी असतात. मात्र धर्म, भाषा, जात यापलीकडे निवडणुका जायला तयार नाही. आरे ला कारे म्हणणे, ठोकाठोकीची भाषा करणे, टोकाला जाऊन राजकारण करणे याच गोष्टी निवडणुकीत जाणीवपूर्वक आणल्या जातात. कारण सामान्य जनतेच्या जगण्या मारण्याच्या प्रश्नावर उमेदवारांना आणि पक्षांना बोलायचेच नसते, असा समज दृढ होत चालला आहे. म्हणूनच हा स्तंभ तुमच्यासाठी. नेत्यांच्या राजकारणात सर्वसामान्य नागरिकांचे मुद्दे गेले कुठे? असा सवाल या स्तंभामधून निवडणुका होईपर्यंत विचारला जाईल.

स्वच्छतागृह : स्लॅबमधून गळती, रस्त्यावरच थेट सांडपाणी शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था अजूनही कायम आहे. शांतीनगर येथील रस्त्यावरच असलेले स्वच्छतागृह हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. स्वच्छतागृहाभोवती सांडपाणी आणि कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. स्वच्छतागृहात ठिकठिकाणी गळती लागली असून, काही भाग कोसळण्याच्या स्थितीत आहे, असे रहिवाशांनी सांगितले. स्लॅबमधून पाण्याची गळती होत असून, ते पाणी थेट रस्त्यावर साचते. त्यामुळे डासांचे साम्राज्य पसरले आहे. पालिका कर्मचारी येतात, पण ते व्यवस्थित साफ करत नसल्याने दुर्गंधी पसरते. नागरिकांना येथून जाताना नाकावर रूमाल धरून जावे लागते.  लोकप्रतिनिधी येतात आणि बघून जातात. पण, त्यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. दुरूस्ती कधी होणार, हा रहिवाशांचा प्रश्न आहे.

सांगा : कल्याणचा हा रस्ता  कधी ओलांडता येणार?कल्याण, पश्चिमेतील स्टेशन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता ओलांडणे म्हणजे जीवघेण्या अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे. या चौकापासून हाकेच्या अंतरावर केडीएमसीचे मुख्यालय आहे. या चौकातून सतत वाहनांची ये-जा सुरू असते. चौकातील एक रस्ता रेल्वेस्थानक, एसटी डेपोसह कल्याण न्यायालय, तहसील कार्यालय, सहायक पोलिस  आयुक्त कार्यालय, पंचायत समिती, रुक्मिणीबाई रुग्णालयाकडे येताे. चारही बाजूने वाहने येत असल्याने रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांचा गोंधळ उडतो. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ठिकठिकाणी सिग्नल यंत्रणा आहे. मात्र याठिकाणी सिग्नल यंत्रणाच नाही. या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याची मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे. मात्र शहरातील एकाही लोकप्रतिनिधीला ही समस्या दिसत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. 

धोका : भिवंडीत प्रदूषण वाढले; मोकळा श्वास घ्यायचा कसा?यंत्रमाग उद्योग असलेल्या भिवंडी शहरात कपड्यावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग साइजिंग कंपन्या मोठ्या प्रमाणात आहेत. या कंपनीतून निघणाऱ्या धुराने भिवंडीकरांचा जीव नकोसा झाला आहे. एकीकडे महापालिका यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त असल्याने प्रदूषणाकडे पालिका प्रशासनासह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. या कंपन्या दिवसाढवळ्या विषारी केमिकल वायू हवेत सोडूनही यंत्रणेच्या नजरेस कसे पडत नाही, हे मोठे आश्चर्य आहे. प्रदूषण एवढे वाढले आहे की, अनेक नागरिकांच्या घरांमध्ये काजळी आली आहे. आम्ही गुदमरून मरावे, अशी तर यंत्रणांची इच्छा नाही ना? असा प्रश्न भिवंडीकरांनी पक्ष व संभाव्य उमेदवारांना विचारला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत प्रदूषणाच्या प्रश्नावरही बोला अशी अपेक्षा आहे.

बोला : डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याचा डोंगर हटणार कधी ?उल्हासनगर शहरातील खडी खदान येथे इतका कचरा साचला आहे की, डोंगर उभा राहिला आहे. या कचऱ्याला सतत आग लागत असल्याने २० हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नाकातोंडात धूर जाऊन  श्वसनाचे विकार जडले आहेत. हे डम्पिंग ग्राउंड हटविण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले, नागरिक  रस्त्यावर उतरले, पण डम्पिंग काही हटले नाही. सरकारने उसाटणे येथे जागा दिली, लाखो रुपये खर्चून कुंपण घातले, तेथील नागरिकांनी डम्पिंगला विरोध केल्याने  समस्या जैसे थे आहे. डोंगर असाच वाढणार की कधीतरी स्वच्छ दिसणार असा प्रश्न विचारला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Where did our issues go in your politics?

Web Summary : Citizens question politicians' neglect of basic amenities like roads, water, and sanitation in favor of divisive issues. Negligence towards public sanitation, dangerous roads, pollution in Bhiwandi, and overflowing dumping grounds in Ulhasnagar highlight civic issues.
टॅग्स :Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६thaneठाणेElectionनिवडणूक 2026