when there was a fracture, the MNS had attended the mns Session | ...अन् फ्रॅक्चर असतानाही 'त्या' मनसैनिकानं लावली मनसेच्या अधिवेशनाला उपस्थिती

...अन् फ्रॅक्चर असतानाही 'त्या' मनसैनिकानं लावली मनसेच्या अधिवेशनाला उपस्थिती

ठाणे : मुंबईतल्या गोरेगावमध्ये मनसेच्या महाअधिवेशनाला राज्यभरातून मनसैनिक दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या महाअधिवेशनात सहभागी होण्यासाठी फ्रॅक्चर असताना देखील मनसे पदाधिकारी तारकेश्वर राव हे गोरेगाव येथे निघाले आहेत. राज यांचे भाषण ऐकण्याची इच्छा त्यांनी मनसेचे कोपरी-पाचपाखडी विभाग अध्यक्ष महेश कदम यांच्याकडे बोलून दाखवली. यावेळी त्यांची तीव्र इच्छा पाहून कदम यांनी त्यांना नेण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार आता ते अँबुलन्समधून ते आपल्या कार्यकर्त्यांसह घेऊन निघाले.

डॉक्टरांनी सल्ला दिलेला असताना देखील महेश कदम यांच्या सहकार्याने तारकेश्वर राव हे केवळ राज यांचे भाषण ऐकण्यासाठी जात असल्याचे ते म्हणाले. डॉक्टरांनी तारकेश्वर राव यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. 15 दिवसांपूर्वी ते ट्रेकला गेले असताना त्यांचा अपघात झाला होता. पायाला फ्रॅक्चर झाले आहे. दीड महिना डॉक्टरांनी आराम करायला सांगितले आहे, परंतु राज यांच्या भाषणाची उत्सुकता आणि त्यांच्या प्रेमपोटी तारकेश्वर राव या अवस्थेत ही महेश कदम यांच्या मदतीने गेले आहेत. 

Web Title: when there was a fracture, the MNS had attended the mns Session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.