शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
2
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
3
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
4
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
5
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
6
दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
7
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
8
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
9
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
10
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
11
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
12
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
13
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
14
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
15
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
16
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
17
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
18
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
19
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
20
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास नदीची जलपर्णीच्या विळख्यातून सुटका कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 00:51 IST

उल्हास नदी ही ३५ लाखांहून जास्त लोकसंख्येसाठी जीवनदायिनी आहे. मात्र, तिच्याच अस्तित्वावर सध्या मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. काही वर्षांपासून नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे.

- सदानंद नाईक, उल्हासनगरउल्हास नदी ही ३५ लाखांहून जास्त लोकसंख्येसाठी जीवनदायिनी आहे. मात्र, तिच्याच अस्तित्वावर सध्या मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. काही वर्षांपासून नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे. जलपर्णीबरोबरच कारखान्यांतून सोडले जाणारे रासायनिक सांडपाण्यामुळेही अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे येथील जलचरांच्याही अस्तित्वावर घाला येत आहे. जलपर्णीत सापडलेले मृत मासे हे या समस्येचे गांभीर्य जाणण्यासाठी पुरेसे ठरावे. तसेच नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांबाबत तज्ज्ञांकडून सातत्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर व ग्रामीण परिसरातील गावाचे सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. त्यामुळे या नदीचे अनेक ठिकाणी नाल्यात रूपांतर झाले आहे. तसेच, पावसाळ्यानंतर नदीची पाणीपातळी कमी होते. त्यामुळे आंध्र व बारवी धरणातून नदीपात्रात पाणी सोडले जाते. हे पाणी विविध ठिकाणी बंधारा बांधून अडवले जाते. त्यानंतर ते पाणी पंपिंग मशिनद्वारे साठवण टाकत आणले जाते. शुद्धीकरणाच्या प्रक्रियेनंतर हे पाणी नागरिकांना पुरवले जाते.नदीची स्वच्छता राखण्याची जबाबदारी ही नदी किनाºयावरील शहरांच्या नगरपालिका, महापालिका यांच्यासह पाटबंधारे विभाग, एमआयडीसी आदींची आहे. याकडे या यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्यानेच नदी प्रदूषित होत आहे. याविरोधात ‘वनशक्ती’ या सामाजिक संस्थेने हरित लवाद आणि न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला. हरित लवादाने नदी किनाºयावरील उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली महापालिकेसह अंबरनाथ नगर परिषद व एमआयडीसीला यासाठी १०० कोटींचा दंड ठोठावला होता.उल्हासनगरातील सांडपाण्याचा खेमानी नाला उल्हास नदीला मिळतो, त्याच पात्रातून एमआयडीसी पंपिंग मशिनद्वारे पाणी उचलून उल्हासनगरसह इतर शहरांना पाणीपुरवठा करते. नदी प्रदूषण होऊ नये, म्हणून नाल्याचा प्रवाह वळवण्याचा सल्ला हरित लवादासह न्यायालयाने महापालिकेला दिला होता. मात्र, निधी नसल्याचे कारण देत महापालिकेने पळवाट काढली. मध्यंतरी अमृत योजनेंतर्गत ३२ कोटींचा निधी नाल्याचा प्रवाह वळवण्यासाठी आणि नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी देण्यात आला. खेमानी नाला अडवून सांडपाणी मोठ्या विहिरीत आणून विहिरीतील सांडपाणी पंपिंग मशिनद्वारे मलनि:सारण केंद्रात नेण्यात येणार आहे. केंद्रात सांडपाण्यावर प्रक्रिया होऊ न वालधुनी नदीत सोडण्यात येणार आहे.मलनि:सारण केंद्राचे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण व्हायला हवे. मात्र, अद्याप केंद्राचे ६० टक्के कामही पूर्ण झालेले नाही. याबाबत गेल्याच महिन्यात न्यायालयाने ताशेरे ओढले. तसेच, शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अमृत योजनेंतर्गत २७९ कोटीच्या योजनेला मान्यता देऊ न योजनेच्या पहिल्या आणि दुसºया टप्प्यात मुख्य मलनि:सारण वाहिन्या टाकून वडोलगाव, शांतीनगर आणि खडेगोलविली येथे मलनि:सारण केंद्राचे काम सुरू आहे.उल्हास नदीत उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण तसेच ग्रामीण परिसरातील सांडपाणी थेट सोडले जात असल्याचे उघड झाले. देशातील प्रदूषित नद्यांमध्ये उल्हास नदीचा समावेश आहे. नदीला प्रदूषणाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. काही वर्षांपासून नदीपात्रात जलपर्णीही फोफावली आहे. जलपर्णी पाण्यातील आॅक्सिजन शोषून घेत असल्याने जलचरांना धोका झाला आहे. नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. त्यामुळे जलपर्णीमुक्त नदीचा मंत्र एका सामाजिक संस्थेने दिला आहे. तसेच, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या एका माजी नगरसेवकाने जलपर्णी काढण्यासाठी उपोषणही केले होते. मात्र, या सर्वांचा संबंधित पालिकांसह राज्य शासन, पाटबंधारे विभागासह एमआयडीसीवर काहीच परिणाम झालेला नाही.ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाºया उल्हासनदीला जलपर्णीचे ग्रहण लागले आहे. या नदीच्या पात्रातील जलपर्णीच्या प्रदूषणामुळे नुकतेच हजारो मासे मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे नदीचे पाणी पिणाºया नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला. मात्र, या समस्येविरोधात अनेक आंदोलने होऊ नही पाटबंधारे विभागासह स्थानिक स्वराज्य संस्था आणि एमआयडीसीकडून उपाययोजना करण्याबाबत अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचेच दिसत आहे. या यंत्रणांमधील समन्वयाचा अभावही याला सर्वस्वी कारणीभूत ठरत आहे.सामाजिक संघटनेचा उत्स्फूर्त सहभागनदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी बदलापूरमधील तरुण-तरुणींना सोबत घेऊ न एका सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊ न त्या परिसरातील नदी पात्रातील जलपर्णीसह कचरा, प्लास्टिक बाहेर काढले. तसेच म्हारळ, वरप, कांबा आदी गावांतील तरुणांनीही स्वयंस्फूर्तीने नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचा प्रयत्न केला. तर सेंच्युरी कंपनीजवळील एमआयडीसी पंपिंग स्टेशन परिसरात सामाजिक संस्थेने महाराष्टÑ दिनी जलपर्णी काढण्याची मोहीम राबविली.पाटबंधारे विभाग, महापालिकेला जागसामाजिक संस्था व तरुणांनी नदीपात्रातील जलपर्णी काढण्यास सुरुवात केल्यानंतर कल्याण-डोंबिवली व पाटबंधारे विभागाला जाग आली असून त्यांनी जेसीबीद्वारे जलपर्णी काढण्याचे काम महाराष्टÑ दिनापासून सुरू केले. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी जलपर्णी काढण्याचे काम पाटबंधारे विभाग, कल्याण-डोंबिवली महापालिकेसह उल्हासनगर महापालिका व अंबरनाथ-बदलापुर नगरपरिषदेने संयुक्तपणे सुरू केले असते तर उल्हास नदीची एवढी दुरवस्था झालीच नसती आणि लाखो नागरिकांना होणारा दूषित पाण्याचा पुरवठा टळला असता. यापुढे तरी या यंत्रणांनी उल्हास नदीला जलपर्णीच्या विळख्यातून सोडवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायला हवेत.

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषण